Ukraine Dainik Gomantak
ग्लोबल

UN मानवाधिकार परिषदेतून रशियाची होणार हकालपट्टी, निरपराधांच्या हत्येचा आरोप

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मुख्य मानवाधिकार संस्थेतून (United Nations General Assembly) रशियाला (Russia) निलंबित करायचे की नाही यावर संयुक्त राष्ट्र महासभा गुरुवारी मतदान करणार आहे. युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवच्या (Kyiv) उपनगरातील बुचा (Bucha) येथून नागरी मृतदेहांची भयानक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर, संयुक्त राष्ट्रातील यूएस राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड (Linda Thomas-Greenfield) यांनी रशियाला 47 सदस्यीय मानवी हक्क परिषदेतून काढून टाकण्यास सांगितले आहे.

दरम्यान, बुचा गावात रशियाने केलेल्या कथित "अत्याचार" चा जगभरातून निषेध होत आहे. रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्यात यावेत अशी शिफारस जगभरातील देशांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, रशियावर होत असलेले सगळे आरोप पुतीन यांनी फेटाळून लावले आहेत.

थॉमस-ग्रीनफिल्ड सोमवारी म्हणाले, "रशियन सैन्याने युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केले आहेत. त्यासाठी रशियाला जबाबदार धरले पाहिजे, असे आमचे मत आहे. "सहभाग हा एक प्रहसन आहे. 'खरचं, रशियन सैन्यांनी बुचामध्ये नरसंहार केला आहे. यादरम्यान अनेक युक्रेनियन नागरिकांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे अनेक अहवालातून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे.''

जिनिव्हात मानवाधिकार परिषद

महासभेच्या प्रवक्त्या पॉलिना कुबियाक यांनी बुधवारी म्हणाले, युक्रेनवरील महासभेचे आपत्कालीन विशेष सत्र गुरुवारी सकाळी 10 वाजता (EDT) पुन्हा सुरु होईल. त्यानंतरच रशियन फेडरेशनच्या मानवाधिकार परिषदेतील सदस्यत्वाचे अधिकार निलंबित करण्याच्या ठरावावर मतदान केले जाईल. मानवाधिकार परिषद जिनिव्हा येथे स्थित आहे, तिचे सदस्य 193-राष्ट्रीय महासभेद्वारे तीन वर्षांसाठी निवडले जातात. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

मारियुपोलमध्ये पाच हजार लोक मारले गेले

त्याच वेळी, मारियुपोलच्या महापौरांनी बुधवारी सांगितले की, 'आतापर्यंत मारियुपोलमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे शहर सध्या रशियन सैन्याच्या ताब्यात आहे.' महापौरांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा युक्रेन राजधानी कीवच्या आसपासच्या शहरांमध्ये नागरिकांच्या क्रूर हत्यांचे पुरावे गोळा करत आहे. असे म्हटले जाते की, युक्रेनच्या काही भागातून रशियन सैन्याने माघार घेण्यापूर्वी युक्रेनियन नागरिकांची हत्या केली. युक्रेनियन अधिकारी राजधानीच्या आसपासच्या शहरांमध्ये विखुरलेले मृतदेह उचलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT