Russia-Ukraine war News Updates, Russian losses in Ukraine war 2022  Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनी लष्कराकडून रशियाचे जहाज नष्ट

‘अझोव्ह’च्या समुद्रामध्ये तडाखेबाज कारवाई

दैनिक गोमन्तक

किव्ह: रशियाच्या युद्धनौकांनी थेट अझोव्हच्या समुद्रातून युक्रेनवर हल्ले करायला सुरूवात केल्यानंतर युक्रेननेही आज त्याला सडेतोड उत्तर दिले. रशियाचे एक लढाऊ जहाज युक्रेनच्या लष्कराने उद्‍ध्वस्त केले. ते मारिऊपोलपासून 45 मैल अंतरावर होते अशी माहिती सूत्रांनी दिली. राजधानी किव्हमधूनही रशियन लष्कराला जोरदार प्रतिकार होत असून रशियाने ताब्यात घेतलेला भूप्रदेश परत मिळविण्याच्या हालचाली युक्रेनकडून सुरू झाल्या आहेत. (Russia-Ukraine war News Updates)

मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षामध्ये रशियाचे सात ते पंधरा हजार सैनिक ठार झाले असल्याचा अंदाज ‘नाटो’कडून व्यक्त करण्यात आला आहे. रशियन आक्रमणाला युक्रेनमधून विरोध होऊ लागला असून या संघर्षाची जबरदस्त किंमत बलाढ्य अशा रशियन लष्कराला देखील मोजावी लागत आहे. तत्पूर्वी दहा वर्षे चाललेल्या अफगाणिस्तान युद्धामध्ये 15 हजार रशियन सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. आता युक्रेनविरोधातील युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या रशियन सैनिकांचा आकडा वाढू लागल्याने पुतीन यांची नाचक्की होऊ लागली आहे. मारिऊपोलमधील रशियन हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढली असून अनेक इमारती आणि रस्ते बॉम्ब हल्ल्यांमध्ये बेचिराख झाले आहेत.

रशियाचे नुकसान

सैनिक 15600

हेलिकॉप्टर 124

रणगाडे 517

लढाऊ विमाने 101

युद्धनौका 4

ड्रोन 42

मदत करणारी वाहने 1008

तोफा 267

मल्टिपल रॉकेट लाँचर 80

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT