रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) पुढील महिन्यात वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत (India) दौऱ्यावर
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) पुढील महिन्यात वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत (India) दौऱ्यावर Dainik Gomantak
ग्लोबल

S-400 क्षेपणास्त्र देण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर?

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) पुढील महिन्यात वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत (India) दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दरम्यान S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र (Missiles) प्रणालीची पहिली तुकडी भारताला दिली जाऊ शकते, असा विश्वास आहे. या भेटीद्वारे, येत्या दशकात दोन्ही बाजूंनी लष्करी-तांत्रिक सहकार्याचे नूतनीकरण करण्यासाठी व्यासपीठ तयार केले जाईल. पुतीन यांच्या भारत भेटीपूर्वी मॉस्कोमध्ये भारत आणि रशियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये टू प्लस टू चर्चा होणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या चर्चा पुतिन यांच्या शिखर परिषदेचा पाया घालतील. S-400 प्रणालीची पहिली तुकडी डिसेंबरपर्यंत वितरित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवी दिल्लीत येण्याची शक्यता आहे. या बैठकीची संभाव्य तारीख म्हणून दोन्ही बाजूने 6 डिसेंबर ठरण्याची शक्यता आहे. आगामी शिखर परिषदेत, भारत आणि रशिया 2021-31 साठी त्यांच्या लष्करी-तांत्रिक सहकार्य व्यवस्थेचे नूतनीकरण करतील. संरक्षण, व्यापार आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे.

S-400 परिषदेसाठी 5.4 अब्ज डॉलरचा करार

शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी केल्या जाणाऱ्या प्रमुख करारांमध्ये परस्पर विनिमय लॉजिस्टिक करार (RELOS) समाविष्ट आहे. RELOS दोन्ही देशांच्या सैन्याला तळ आणि बंदरांवर रसद आणि समर्थन सुविधा पुरवण्यासाठी मदत करेल. पाच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करून भारताने रशियाशी दीर्घकालीन संरक्षण संबंधांची आपली वचनबद्धता वाढवली आहे. याअंतर्गत 5.4 अब्ज डॉलरचा करार करण्यात आला आहे. त्याच वेळी, अमेरिकेने या कराराबद्दल इशारा दिला होता की, काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत देखील निर्बंध लादले जाऊ शकतात.

चीनसोबतच्या वादात S-400 बनणार हवाई दलाचा भाग

भारतीय हवाई दलाच्या जवानांनी रशियामध्ये एस-400 चालवण्यासाठी अनेक वेळा प्रशिक्षणही घेतले आहे. भारत आणि रशियाने ऑक्टोबर 2018 मध्ये या करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत पाच वर्षात सर्व क्षेपणास्त्र यंत्रणा पुरवायच्या आहेत. लडाखमध्ये भारत चीनसोबतच्या सीमा विवादात अडकलेला असताना आयएएफ S-400 प्रणालीचे पहिले युनिट आपल्या ताफ्यात समाविष्ट करेल. त्याचवेळी चीनने शिनजियांगमधील होटन एअरबेस आणि तिबेटमधील निंगची एअरबेसवर दोन S-400 स्क्वॉड्रन तैनात केले आहेत. एकाची लडाखमध्ये, तर दुसरी अरुणाचल प्रदेशात नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT