Russian Artist Jailed For Seven Years
Russian Artist Jailed For Seven Years  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेन युद्धाला विरोध करणं पडलं महागात, रशियन महिला कलाकाराला न्यायालयाने सुनावली सात वर्षांची शिक्षा

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. यातच आता, युक्रेन युद्धाला विरोध केल्याबद्दल रशियन महिला कलाकाराला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रशियन महिला कलाकार अलेक्झांड्रा स्कोचिलेन्कोने युक्रेन युद्धाचा अतिशय अनोख्या पद्धतीने निषेध केला.

स्कोचिलेन्कोने प्राइस टॅग बदलून या युद्धाचा निषेध केला. स्कोचिलेन्कोला गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाच्या प्रेस रिलीजनुसार, ती सैन्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल दोषी आढळली आणि तिला तीन वर्षांच्या बंदीसह सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

सीएनएनच्या अहवालानुसार, सरकारी वकिलांनी दावा केला की, गेल्या वर्षी मार्चमध्ये सेंट पीटर्सबर्गमधील चेन सुपरमार्केटमध्ये प्राइस टॅग बदलून स्कोचिलेन्कोने युक्रेन (Ukraine) युद्धाचा निषेध केला.

प्राइस टॅगच्या जागी कागदाचा तुकडा वापरण्यात आला होता, ज्यामध्ये लष्कराबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. मात्र, महिला कलाकाराने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

स्कोचिलेन्को 2022 पासून प्री-ट्रायल कोठडीत आहे

दरम्यान, असे असतानाही तिच्यावर खटला चालवून तिला शिक्षा सुनावली. युक्रेन युद्धाविरोधात तिने शांततेने निषेध केल्याचे स्कोचिलेन्कोने सांगितले. स्कोचिलेन्कोने सुनावणीदरम्यान न्यायालयात युक्तिवादही केला. मात्र न्यायालयाने (Court) तिचे म्हणणे न ऐकता शिक्षा सुनावली. स्कोचिलेन्कोला एप्रिल 2022 पासून प्री-ट्रायल कोठडीत ठेवण्यात आले होते.

दुसरीकडे, स्कोचिलेन्कोने सांगितले की, प्रोसेक्यूटरला आपल्या देशावर आणि समाजावर किती कमी विश्वास आहे. कागदाच्या काही तुकड्यांमुळे देशाची सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे त्यांना वाटते. युक्रेनवर रशियाच्या आक्रमकतेमागचा उद्देश त्यांना समजत नसल्याचेही तिने पुढे म्हटले.

632 दिवसांपासून युद्ध सुरु आहे

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 632 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात अद्याप ना रशिया जिंकला ना युक्रेन हरला, तरीही युद्ध सुरुच आहे. या प्रदीर्घ युद्धात दोन्ही देशांचे खूप नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे नष्ट केली. काही शहरे काबीजही केली. मात्र युक्रेनने अद्याप या युद्धात पराभव स्वीकारलेला नाही. हे युद्ध अजून किती दिवस सुरु राहणार हे पाहणं बाकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT