Air Strike Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाची युक्रेनवर Air Strike, 16 ठार; पुतिन यांच्या हत्येचा...

Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपादरम्यान रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे.

Manish Jadhav

Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपादरम्यान रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन भागात रशियाच्या हल्ल्यात 16 लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने सरकारी वकिलांच्या हवाल्याने ही माहिती दिली. यापूर्वी, रशियाच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, युक्रेनने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हत्येच्या प्रयत्नात काल रात्री दोन ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला केला. तर, क्रेमलिनने या हल्ल्याच्या प्रयत्नाला दहशतवादी कृत्य म्हटले.

ड्रोन कुठून आला?

क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे रशियाचे म्हणणे आहे. त्यांनी या हल्ल्याचा आरोप युक्रेनवर केला आहे. या हल्ल्याबाबत मात्र युक्रेनकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. क्रेमलिनवर ज्या ड्रोनने हल्ला केला होता, तो रशियाने पाडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन या हल्ल्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत. क्रेमलिन हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. क्रेमलिनमध्ये ड्रोन येणे ही तेथील सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे बोलले जात आहे.

क्रेमलिन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे

रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय क्रेमलिनमध्ये आहे. ते क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. अशा स्थितीत ड्रोन एवढ्या जवळ येणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या हल्ल्याचा नक्कीच बदला घेणार असून लवकरच रशिया या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, असे क्रेमलिनने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या या युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. रशियाच्या आरोपांना युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

EU युक्रेनसाठी दारुगोळा उत्पादन वाढवणार

दरम्यान, युरोपियन युनियनने दारुगोळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी नवीन योजना जाहीर केल्या आहेत. रशियाशी युद्धात अडकलेल्या युक्रेनला मदत करणे आणि संस्थेची भौगोलिक राजकीय विश्वासार्हता सुधारणे हा ईयूचा प्रयत्न आहे. विश्लेषकांच्या मते, युक्रेन रशियाच्या ताब्यातील प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रतिआक्रमण सुरु करण्याची तयारी करत आहे, परंतु दारुगोळा संपत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT