Russia Cyber ​​Attacks on Ukraine Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियाचे युक्रेनवर सायबर हल्ले

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने बुधवारी नाटोच्या दोन सदस्य देश बुल्गेरिया आणि पोलंडला गॅस पुरवठा थांबवला आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे, सुरुवातीला रशियासमोर युक्रेन फार काळ टिकणार नाहीये, असे मानले जात होते, मात्र मित्रपक्षांच्या मदतीने युक्रेन अजूनही रशियाला टक्कर देताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता रशियाने दारूगोळ्यासह सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले की रशियन सरकार समर्थित हॅकर्सनी गेल्या काही वर्षांत युक्रेनमधील बारा हून आधिक संस्थांवर हल्ले केले आहेत, आणि त्यांचा डेटा नष्ट केला आहे तसेच "अराजक माहितीचे वातावरण देखील निर्माण करण्यात आले." (Russia Ukraine War Russia Cyber ​​Attacks on Ukraine)

अहवालात असे देखील म्हटले गेले की सुमारे निम्मे हल्ले हे गंभीर पायाभूत सुविधांवर अवलंबून होते आणि असे अनेक हल्ले बॉम्बस्फोटांसोबतच करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने म्हटले की रशियाशी संलग्न गट मार्च 2021 पासून हल्ल्याची तयारी करत होते जेणेकरून ते धोरणात्मक आणि युद्धक्षेत्रातील गुप्तचर गोळा करण्यासाठी नेटवर्क हॅक करू शकतील आणि भविष्यात त्याचा देखील वापर करू शकतील. अहवालानुसार, युद्धादरम्यान, हॅकर्सनी विश्वासार्ह माहिती आणि गंभीर सेवांमध्ये नागरिकांच्या प्रवेशामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने बुधवारी नाटोच्या दोन सदस्य देश बुल्गेरिया आणि पोलंडला गॅस पुरवठा थांबवला आहे. रशियाने ताज्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की ते इतर ईयू देशांचा देखील गॅस पुरवठा थांबवू शकतात. यासोबतच 27 सदस्यीय EU देशांची चिंतेत वाढ झाली आहे.

रशियाच्या या हालचालीमुळे पाश्चिमात्य देशांसोबतच्या त्याच्या संघर्षाची व्याप्ती अधिक व्यापक होत गेली आहे. रशियन प्रेसिडेंशियल हाऊस क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी गॅस पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, जर त्यांनी रुबलमध्ये पैसे देण्यास नकार दिला तर इतर युरोपीय देशांचा गॅस पुरवठा देखील थांबविला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT