Russian Warship Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाला मोठा झटका, युक्रेनियन सैन्याने युद्धनौकेवर केला हल्ला

Russian Warship Attack: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्षे झाली आहेत. हे युद्ध संपताना दिसत नाही.

Manish Jadhav

Russian Warship Attack: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्षे झाली आहेत. हे युद्ध अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले तेव्हा ते इतके दिवस चालेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पाश्चात्य देशांचा पाठिंबा असलेले युक्रेनचे सैन्य रशियाला कडवी झुंज देत आहे. दरम्यान, रशियाला मोठा झटका बसला आहे. युक्रेनने रशियन युद्धनौका नष्ट केली आहे. युक्रेनच्या लष्कराने ब्लॅक सी मध्ये रशियाच्या युद्धनौकेवर हल्ला केला. रशियाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. हल्ल्यानंतर रशियन युद्धनौकेला आग लागली. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले की युक्रेनने फिओडोसियाच्या क्रिमियन बंदरावर हल्ला केला आणि नौदलाच्या लँडिंग जहाजाचे नुकसान केले. "आज संरक्षण मंत्री शोईगु यांनी (पुतिन) युक्रेनने फिओडोसियावर केलेल्या हल्ल्याबद्दल आणि आपल्या मोठ्या लँडिंग जहाजाचे नुकसान याबद्दल माहिती दिली," असे राष्ट्रपतींचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले.

युक्रेन अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे

रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिका पूर्वीपासून रशियाचा कट्टर विरोधक आहे. आता फेब्रुवारी 2021 पासून रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केले आहे. अमेरिकेने उघडपणे युक्रेनला पाठिंबा दिला आहे. आर्थिक मदतीव्यतिरिक्त अमेरिका लष्करी मदतीद्वारे रशियाला सातत्याने धक्के देत आहे. केवळ अमेरिकन मदतीच्या जोरावरच युक्रेन इतके दिवस रशियाच्या विरोधात उभा राहिला आहे. आता युक्रेनला अमेरिकेची मदत मिळाली नाही तर युक्रेनचे युद्धात मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्धात टिकू शकणार नाही, असे वृत्त आहे. दुसरीकडे, रशियाही याचीच वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT