Russia Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाचा ताण वाढणार, 51 टक्के लोक नाटोमध्ये सामील होण्याच्या मार्गावर

युरोपीय देश असलेल्या स्वीडनमधील 51% लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी नाटोसोबतच जावे.

दैनिक गोमन्तक

नाटो (NATO) संघटनेत सामील होण्याच्या शक्यतेमुळे रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला होता, पण आताही युद्धाचा त्याचा तणाव संपताना दिसत नाहीये. युरोपीय देश असलेल्या स्वीडनमधील 51% लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी नाटोसोबतच जावे. नाटोमध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या देशाची सुरक्षा मजबूत होणार आहे, आणि असा नागरिकांचा विश्वास आहे. स्वीडनने (Sweden) आतापर्यंत तटस्थ देश म्हणून आपली भूमिका बजावली, परंतु तेथील बहुतांश नागरिकांचे मत मात्र धक्कादायक आहे. तर नोव्हस या मतदान संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. यावेळी 51 टक्के लोकांनी NATO सोबत जाण्यास सहमती दर्शवली, जी गेल्या आठवड्यात 45% वर होती. (Russia tensions will rise with 51 percent on the verge of joining NATO)

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर स्वीडनमधील लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की त्यांनी आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नाटोचा एक भाग व्हावे. मोठी गोष्ट म्हणजे स्वीडन व्यतिरिक्त फिनलंड देखील NATO चा भाग बनण्याच्या विचारामध्ये आहे. त्याचा प्रस्ताव जूनमध्ये नाटोकडे सादर केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. गेल्या आठवड्यात, फिन्निश पंतप्रधानांनी स्वीडनला भेट दिली आणि पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांची परस्पर भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये नाटोचा भाग होण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते आहे.

सर्वेक्षण एजन्सी नोव्हसचे प्रमुख टोर्बजॉर्न जॉस्ट्रॉम म्हणाले की: "स्वीडनमधील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचा देश फिनलँडसह नाटोचा भाग झाले पाहिजेत." आणि सुरक्षेबाबत लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली, ते म्हणाले की जेव्हा लोकांना विचारले गेले की स्वीडनने फिनलंड नाटोचा भाग बनल्यास काय करायला हवे. यावर 64 टक्के लोकांनी म्हटले की, अशा परिस्थितीत स्वीडनने नाटोचा भाग बनायला हवे. विशेष म्हणजे रशियाने युक्रेनकडून मागणी केली की, आपण नाटोचा भाग बनणार नाहीये, असे सांगावे तरच त्याच्यावर सुरू असलेले हल्ले थांबणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT