oil  Dainik Gomantak
ग्लोबल

NATO देशांवर सूड उगवण्यास सुरुवात! पुतिन यांनी बंद केला दोन देशांचा गॅस पुरवठा

रशियाकडून गॅस-तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) युद्धात युक्रेनला उघडपणे मदत करणे आणि रशियाचे म्हणणे न मानणे युरोपातील काही देशांना (NATO) महागात पडताना दिसत आहे. अत्यंत कठोर पावले उचलत रशियाने पोलंड आणि बल्गेरियाचा गॅस-तेल (Oil Supply) पुरवठा बंद केला आहे. गेल्या महिन्यात पुतिन यांनी रशियाकडून गॅस-तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले होते, परंतु युरोपातील देशांनी पुतीन यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला होता. यानंतर आता पुतिन यांनी कडक कारवाई करत पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलंड आणि बल्गेरियाच्या मते, रशियन ऊर्जा दिग्गज गॅझप्रॉमने त्यांना सांगितले की. ते गॅसचा पुरवठा थांबवत आहेत. पोलिश गॅस कंपनी पीजीएनआयजीने सांगितले की, रशियाने यमल-युरोप पाइपलाइनद्वारे गॅस वितरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, बल्गेरियाच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, रशिया देखील तुर्कस्ट्रीम पाइपलाइनद्वारे बल्गेरियाला येणारा गॅस पुरवठा थांबवत आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरुवातीपासूनच पोलंड उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत आहे. पोलंडने युक्रेनला युद्ध लढण्यासाठी अनेक शस्त्रेही दिली आहेत. पोलंडच्या सरकारने या आठवड्यात सांगितले की ते युक्रेनियन सैन्याला टाक्या पाठवत आहेत. युरोपमध्ये रशियामधून येणारा नैसर्गिक वायू घरे गरम करण्यासाठी, वीज निर्माण करण्यासाठी आणि इंधन म्हणून वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

आतापर्यंत सर्व युरोपियन देश सुमारे 60 टक्के युरोमध्ये आणि उर्वरित डॉलरमध्ये देत आहेत. युक्रेनबरोबरच्या युद्धानंतर, पिटॉनने मागणी केली की हे पेमेंट पूर्णपणे रशीयन चलन रूबलमध्ये केले जावे. यावर युरोपीय देशांच्या नेत्यांनी हे पूर्वनिश्चित अटीचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते रुबलद्वारे पैसे देणार नाहीत. पोलंड दरवर्षी सुमारे 9 अब्ज घन मीटर रशियन वायू आयात करतो. याद्वारे देशाच्या सुमारे 45 टक्के गरजा भागवल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT