Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरावर हवाई हल्ला; 6 ठार, 10 हून अधिक जखमी

Russia Air Attack: युक्रेनच्या पलटवारानंतर रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मोठा हवाई हल्ला केला आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक घातक होत चालले आहे. युक्रेनच्या पलटवारानंतर रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मोठा हवाई हल्ला केला आहे. खार्किव येथे झालेल्या रशियन हल्ल्यात सहा जण ठार तर 10 हून अधिक जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खार्किव हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, असे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी पहाटे येथे रशियन हल्ल्यामुळे अचानक खळबळ उडाली. युक्रेनच्या राष्ट्रीय पोलिसांनी हा हल्ला ड्रोनने केल्याचे सांगितले. यामध्ये शहरातील रस्त्यांवर आणि इमारतींच्या शेजारी पेटलेल्या आगीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, जी परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी पुरेशी आहेत.

"आज सकाळपर्यंत, शेवचेन्किव्स्की जिल्ह्यात रात्रीच्या हल्ल्यात 6 लोक ठार तर 10 हून अधिक जखमी झाले," असे खार्किवचे महापौर इहोर तेरेखोव यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले. हल्ल्यामध्ये निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले. नऊ उंच इमारती, तीन वसतिगृहे, अनेक प्रशासकीय इमारती, एक दुकान, एक पेट्रोल स्टेशन, एक सर्व्हिस स्टेशन आणि कारचे नुकसान झाले," असेही त्यांनी सांगितले. मध्यरात्रीनंतर हवाई हल्ला झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. युक्रेनच्या लष्कराने फेसबुकवर सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षणाने रशियाने सोडलेल्या 32 पैकी 28 ड्रोन आणि सहा पैकी तीन क्षेपणास्त्रे नष्ट केली.

पुतिन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर युक्रेनवरील हल्ले तीव्र झाले

दरम्यान, युक्रेनच्या ईशान्येला असलेले खार्किव हे शहर सातत्याने रशियाच्या टार्गेटवर राहिले आहे. पुतीन पुन्हा रशियाचे अध्यक्ष झाल्यानंतर युक्रेनवरील हल्ले अलिकडच्या आठवड्यात वाढले आहेत. बुधवारी शहरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात चार जण ठार झाले आणि अपार्टमेंट ब्लॉक्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रेसिडेंट झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ, आंद्रे येरमाक यांनी गुरुवारी प्रकाशित केलेल्या एका मुलाखतीत न्यूज आउटलेट पॉलिटिकोला सांगितले की, मे किंवा जूनमध्ये कोणत्याही नवीन रशियन हल्ल्यासाठी खार्कीव्ह हे सर्वात संभाव्य लक्ष्य आहे.

दुसरीकडे, खार्किवचे प्रादेशिक गव्हर्नर ओलेह सिनिहुबोव्ह यांनी एका निवासी इमारतीवर हल्ला आणि खार्किव शहराच्या उत्तरेकडील गावावर क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली. शुक्रवारी हा स्फोट युक्रेनच्या झापोरिझिया शहरातील रशियन हल्ल्यातून झाला. हल्ल्यानंतर काही तासांपर्यंत खार्किव आणि राजधानी कीवसह देशातील बहुतांश भागात हवाई हल्ल्याचा इशारा लागू राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT