आजकाल जगातील अनेक देशांमध्ये मांकीपॉक्स रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. या आजाराने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. बहुतेक रुग्ण संख्या युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेत वाढत आहे. दरम्यान पूर्व सोव्हिएत शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगात खळबळ उडाली आहे. (Russia could use monkeypox as a biological weapon The claim of a former Soviet scientist caused a stir in the world)
खरं तर, शास्त्रज्ञ म्हणाले की, रशियाने कमीतकमी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत मंकीपॉक्सचा जैविक हत्यार म्हणून वापर करण्याच्या शक्यतेचा विचार केला होता. जर रशियाने आता जैविक हत्यार म्हणून मंकीपॉक्सचा (Monkeypox) वापर केला तर जगाचा विनाश होऊ शकतो. त्याच वेळी जगातील अनेक देश रशियाविरुद्ध युद्ध पुकारतील.
डेली मिररच्या वृत्तानुसार, सोव्हिएत युनियनच्या (Soviet Union) काळात जैविक शस्त्रास्त्रांचे तज्ञ कर्नल कानाट अलीबेकोव्ह यांनी दावा केला की, 'त्या काळात कशाप्रकारे व्हायरसचा हत्यार म्हणून वापर करता येईल, यासाठी एक कार्यक्रम राबवण्यात आला होता.' 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे पतन होईपर्यंत ते देशाच्या जैविक शस्त्रास्त्र कार्यक्रमाचे उपप्रमुख होते.
जैविक शस्त्र दोन आठवड्यांत तयार होईल
माजी शास्त्रज्ञ म्हणाले, 'आमची कल्पना होती की, या मॉडेल व्हायरसचा वापर करुन सर्व संशोधन आणि विकास कार्य केले जाईल. एकदा आम्हाला सकारात्मक परिणाम मिळू लागल्यानंतर, दोन आठवड्यांच्या आत चेचक विषाणू हाताळला जाईल आणि युद्धासाठी तयार होईल. माजी शास्त्रज्ञ पुढे म्हणाले, 'सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, रशियन संरक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला. भविष्यातील जैविक शस्त्रे बनवण्यासाठी मंकीपॉक्स विषाणूवर काम करणे सुरु आहे.'
मंकीपॉक्स म्हणजे काय?
जैविक शस्त्रास्त्रांचे तज्ज्ञ कर्नल कानाट अलीबेकोव्ह यांना अमेरिकन काँग्रेसमध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. जिथे ते म्हणाले की, रशियाचा (Russia) जैविक शस्त्र कार्यक्रम पूर्णपणे संपलेला नाही. विशेष म्हणजे, मंकीपॉक्स हा मानवी चेचक सारखाच एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो पहिल्यांदा आढळून आला. मंकीपॉक्सच्या संसर्गाचा पहिला रुग्ण 1970 मध्ये आढळून आला. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्ये पसरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.