iPhone Banned In Russia Dainik Gomantak
ग्लोबल

iPhone: 'या' देशाने सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोन वापरण्यास घातली बंदी; म्हणाले, 'इतर पर्याय शोधा...'

iPhone News: रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (FSS) हजारो अधिकाऱ्यांना iPhones आणि iPads सारखी Apple उत्पादने वापरणे थांबवण्यास सांगितले आहे, असे फायनान्शियल टाईम्सने वृत्त दिले आहे.

Manish Jadhav

iPhone Banned In Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच रशियाने सरकारी अधिकार्‍यांच्या iPhones वापरण्यावर बंदी घातली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (FSS) हजारो अधिकाऱ्यांना iPhones आणि iPads सारखी Apple उत्पादने वापरणे थांबवण्यास सांगितले आहे, असे फायनान्शियल टाईम्सने वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, 17 जुलैपासून रशियाच्या व्यापार मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आयफोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आयफोन वापरावर बंदी

सूत्रांचा हवाला देऊन अहवालात म्हटले आहे की, "मंत्रालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, आयफोन यापुढे सुरक्षित मानला जात नाही आणि पर्यायांचा शोध घेणे आवश्यक आहे."

दुसरीकडे, अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की अमेरिकन वायरटॅपिंगसाठी त्यांची उपकरणे वापरु शकतात. व्यावसायिक संपर्कांसाठी आयफोनच्या वापराबाबत एफएसबी फार पूर्वीपासून चिंतेत आहे. मार्चमध्ये, क्रेमलिनने अधिकाऱ्यांना Apple प्रोडक्ट वापरणे थांबवण्यास सांगितले होते, कारण अमेरिकेकडून (America) हॅक होण्याची शक्यता अधिक आहे.

रशियन सरकारने...

गेल्या महिन्यात, पुतीन सरकारने (Government) ऍपलवर यूएस गुप्तचर संस्थांसोबत काम केल्याचा आरोप केला होता. मात्र, हा दावा टेक जायंटने पूर्णपणे नाकारला. अॅपलने सांगितले की, कंपनीने कधीही सरकारसोबत काम केले नाही.

रोस्टेकच्या प्रतिनिधीने फायनान्शियल टाईम्सला सांगितले की, हे निर्बंध सर्व Apple उपकरणांवर लागू आहेत. परंतु वैयक्तिक हेतूंसाठी त्यांचा वापर करण्यास अद्याप परवानगी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT