Embassy Dainik Gomantak
ग्लोबल

''आमच्या दूतावासाची सुरक्षा सुनिश्चित करा''; प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताचा कॅनडाला इशारा

Manish Jadhav

India-Canada Relations: प्रजासत्ताक दिनानिमित्त खलिस्तानी दहशतवाद्यांच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाला इशारा दिला आहे. भारताने कॅनडाला आपल्या राजनैतिक संकुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी कॅनडातील भारतीय मिशनमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केले जातील. यादरम्यान खलिस्तानी दहशतवादी अशांतता निर्माण करु शकतात. खलिस्तान समर्थक तत्वांच्या निषेधाच्या धमकीमुळे भारताने कॅनडाला सुरक्षा सुनिश्चित करण्याविषयी सांगितले आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले की, "भारतीय उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांना सावध केले आहे."

दरम्यान, गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत (हाऊस ऑफ कॉमन्स) भारतावर गंभीर आरोप केले होते. 18 जून रोजी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचे ट्रूडो म्हणाले होते. भारताने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. दुसरीकडे, भारताने ट्रुडो यांचे आरोप मूर्खपणाचे ठरवून फेटाळले होते. या संपूर्ण वादानंतर, कॅनडातील सर्व मिशनमध्ये ध्वजारोहण सैमारंभासह राष्ट्रीय समारंभ आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा नेता अमृतपाल सिंगला अटक केल्यानंतर खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली होती. तेव्हापासून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 23 मार्च 2023 रोजी आंदोलकांनी भारतीय उच्चायुक्तालयाचा रस्ता ओलांडून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जूनमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अमृतपाल सिंग याचा मेहुणा अमरजोत सिंग याला त्या निषेधाचे नेतृत्व केल्याबद्दल आरोपी बनवण्यात आले होते. या हल्लेखोरांनी उच्चायुक्तालयावर स्मोक बॉम्ब फेकले होते. दरम्यान, कॅनडाच्या पोलिसांनी या घटनेचा तपास केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, निज्जर याच्या हत्येनंतर शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी संघटनेनेही कॅनडातील भारतीय अधिकार्‍यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कॅनडातील सर्वात वरिष्ठ भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांच्या फोटोखाली 'वॉन्टेड' हा शब्द असलेल्या पोस्टरच्या माध्यमातून इशारा दिला होता. त्याचबरोबर यादरम्यान खलिस्तान्यांनी कॅनडातील अनेक हिंदू मंदिरांनाही लक्ष्य केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT