Moon J In & Kim Jong Un Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरिया अन् दक्षिण कोरिया पुन्हा एकत्र

किम जोंग (Kim Jong Un) आणि मून यांनी एप्रिल महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पत्रांद्वारे वार्तालाप करत आहेत असं सांगितलं आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरिया (North Korea) किम जोंग (Kim Jong Un) आणि दक्षिण कोरियाचे (South Korea) प्रमुख मून जे इन (Moon J In) यांनी दोन्ही देशांमधील कटु नात्यांमध्ये (Inter-Korean Relations) पुन्हा स्थिरता निर्माण करण्यासाठी आणि विस्तारित दोन्ही देशांमध्ये पुन्हा नव्याने वार्तालाप घडविण्यासाठी सुधारित पत्रांमध्ये सहकार्यावर सहमती दर्शवली आहे. दक्षिण कोरियाई राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सोमवारी एका पत्रक जाहीर करत किम जोंग (Kim Jong Un) आणि मून यांनी एप्रिल महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पत्रांद्वारे वार्तालाप करत आहेत असं सांगितलं आहे.

पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मतानुसार लवकरच दोन्ही देशांनी विश्वास संपादन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. दक्षिण कोरियाने सोमवारी 10 वाजता दोन्ही देशांमध्ये हॉटलाइन सेवा पुन्हा एकदा चालु करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. जी एका वर्षापूर्वी बंद करण्यात आली होती. युध्दविराम कराराच्या पाश्वभूमीवर 68 वी वर्षाच्या सहमतींवर हे मोठे पाऊल उचलले आहे. ज्याद्वारे 1950-53 मध्ये दोन्ही कोरियन देशांमधील लढाई थांबविण्यात आली होती.

दोन्ही देश आपआपसांमध्ये सुरु कर शकतात अलर्ट मॅसेज

दोन्ही कोरियन देशांमध्ये युध्दाची सुरुवात झाल्यानंतर निरतंर संचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र 2020 मध्ये कोरियन देशांमध्ये मागील काही दशकांपासून खराब झालेल्या संबंधानंतर ती सेवा बंद करण्यात आली होती. तज्ञ मानतात की, दोन्ही देशांनी एकत्र येत नवी कार्यप्रणालीची सुरुवात केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी ही पाऊले उचलली असल्याचे स्वागत केले आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

तज्ञांच्या मतानुसार, दोन्ही देशांमध्ये हॉटलाईन सुरु झाल्यानंतर अलर्ट संदेश पाठवू शकता येणार आहे. त्याचबरोबर चक्रिवादळे आणि महापूरासंबंधीची चेतावणीही देता येणार आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु करण्यात आलेल्या सेवाचा वापर सीमासंबंधीच्या वादग्रस्त मुद्द्यांवर सुधारणा करण्यात येऊ शकते. कोरियन देशांमधील संबंधाचा परिणाम अमेरिकावरही होऊ शकतो. संभावना व्यक्त करण्यात येत आहे की, उत्तर कोरिया परमाणू कार्यक्रमावरही चर्चा करण्यासाठी तयार होऊ शकतो.

उत्तर कोरियाची सकारत्मकतकडे वाटचाल दिशेने

उत्तर कोरियाचे सध्या अनेक प्रतिबंधाचा सामना करत आहे. तज्ञांच्या मतानुसार, उत्तर कोरियाला या प्रतिबंधापासून सुटका पाहिजे आहे. मात्र दोन्ही कोरियन देशांमध्ये सुरु करण्यात आलेल्या हॉटलाईनचा फायदा उत्तर कोरियाला प्रतिबंध हटविण्यासाठी होणार नाही. उत्तर कोरियाच्या न्यूज एजेन्सी केसीएनए सांगितले आहे की, दोन्ही देशांमध्ये सुरु करण्यात आलेल्या हॉटलाईन सेवा पुन्हा एकदा नव्याने सुरु करण्यात आली आहे. ज्याचा येणाऱ्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम जाणवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT