Houthi Anti-Ship Ballistic Missile and Iranian UAVs shot down in Gulf of Aden Dainik Gomantak
ग्लोबल

Red Sea War: समुद्रात युद्ध! हुथी बंडखोरांनी डागलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र; अमेरिकेनंही दिलं जशाच तसं उत्तर

Red Sea War: जगात सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Red Sea War: जगात सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, हुथी या बंडखोर संघटनेने समुद्रातील त्यांच्या कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. विशेष म्हणजे, या बंडखोर संघटनेने थेट अमेरिकेशी पंगा घेतला आहे. दरम्यान, अमेरिकाही हुथीच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. हुथीने पुन्हा एकदा एडनच्या आखातात जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागले. हे क्षेपणास्त्र अमेरिकन हद्दीत डागण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमेरिकेने वेळीच हुथींचे हे क्षेपणास्त्रे यशस्वीपणे पाडले. याबाबत यूएस सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले की, आज अमेरिकन युद्धनौकेची सुटका झाली.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिकेच्या प्रदेशात क्षेपणास्त्र डागले. यावर USS Gravely ने क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी Close In Weapon System (CIWS) चा वापर केला. एका अहवालानुसार, जॉर्डनमध्ये इराण समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन ठार झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

इराण हुथींना शस्त्रे पुरवत आहे

यूएस सेंट्रल कमांड (CENTOM) ने सांगितले की, याआधी 11 जानेवारी रोजी अमेरिकेने येमेनमधील हुथींवर अनेक हल्ले केले होते, ज्यात बंडखोरांची शस्त्रे नष्ट झाली होती. यानंतर इराण हुथींना सातत्याने शस्त्रे पुरवत आहे. याबाबत, अमेरिकन नौदलाने अलीकडेच सोमालियाच्या किनाऱ्याजवळ हुथींकडून इराणमध्ये बनवलेली बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे ताब्यात घेतली होती. समुद्रातील वाढत्या तणावाबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, आम्हाला इराणसोबत युद्ध करायचे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT