Tanzania Heavy Rain Dainik Gomantak
ग्लोबल

Tanzania Heavy Rain: टांझानियामध्ये पाऊस आणि पुराचा कहर, 58 जणांचा मृत्यू; लाखो लोक प्रभावित

Tanzania Heavy Rain: टांझानियामध्ये आलेल्या पुरामुळे गेल्या दोन आठवड्यात किमान 58 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Tanzania Heavy Rain: टांझानियामध्ये आलेल्या पुरामुळे गेल्या दोन आठवड्यात किमान 58 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर्व आफ्रिकेतील या देशात मुसळधार पाऊस सुरु आहे. ही माहिती देताना सरकारने सांगितले की, पावसाने किनारपट्टी भागात सर्वाधिक कहर केला असून सुमारे 1,26,831 लोक बाधित झाले आहेत. सरकारचे प्रवक्ते मोभारे मतिनी यांनी सांगितले की, रविवारी बाधित लोकांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, टांझानियाने भविष्यात अशाप्रकारची पूरस्थिती टाळण्यासाठी 14 धरणे बांधण्याची योजना आखली आहे. पूर्व आफ्रिकेच्या काही भागांमध्ये, लोकांना मुसळधार पाऊस आणि पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. केनियामध्ये पुरामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पुरामुळे परिस्थिती बिकट

पूर्व आफ्रिकेच्या काही भागात लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुरामुळे कहर होत आहे. केनियामध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 13 जणांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याने इशारा दिला

एल निनोमुळे यंदा पावसाचे प्रमाण वाढले असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच, नैसर्गिकरित्या उद्भवणारा एल निनो, जो 2023 च्या मध्यात उदयास आला. साधारणपणे त्यानंतर एक वर्ष जागतिक तापमान वाढते.

जोरदार पावसाची शक्यता

यामुळे जगाच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन ग्रुपच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पूर्व आफ्रिकेतील पावसाची नोंद आतापर्यंतच्या सर्वात जास्त पावसापैकी एक होती. ते म्हणाले की, हवामान बदल देखील या घटनेला कारणीभूत आहेत, ज्यामुळे मुसळधार पाऊस दुप्पट तीव्र झाला.

दुसरीकडे, पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. एवढेच नाही तर परिस्थिती इतकी भीषण आहे की, सरकारने बलुचिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या पावसामुळे देशातील विविध भागात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या खैबर पख्तूनख्वामध्ये रविवारी 12 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, पंजाबमध्ये 4 आणि बलुचिस्तानमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानच्या मकरानमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी वीज पडली. या घटनांमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बलुचिस्तानमधील मृतांची संख्या 10 झाली आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बलुचिस्तान सरकारने आणीबाणी घोषित केली आहे. मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक बोलावली आहे. या पावसामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी बैठकीनंतर सांगितले की, आम्ही बचाव पथकांना तातडीने लोकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT