Rishi Sunak & Liz Truss DainiK Gomantak
ग्लोबल

पंतप्रधानपदाची संपली शर्यत, ऋषी सुनक की लिझ ट्रस; 5 सप्टेंबरला PM पदाच्या नावाची घोषणा

Rishi Sunak & Liz Truss: या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले आहे.

दैनिक गोमन्तक

Britain Prime Minister Election: ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची शर्यत आता संपली आहे. बोरिस जॉन्सन यांच्या जागी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्यातील निवडणूक शुक्रवारी शेवटच्या टप्प्यात संपली. या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले आहे.

5 सप्टेंबर रोजी जाहीर होईल

विजेत्याच्या नावाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता केली जाईल. सुनक (42) आणि ट्रस (47) यांनी मते मिळविण्यासाठी आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अंदाजे 160,000 सदस्यांवर प्रभाव टाकण्यासाठी अनेकवेळा आमने-सामने आले.

ट्रस यांनी सुनक यांचा त्रास वाढवला

भारतीय वंशाचे ऋषी सुनक सध्या या निवडणुकीत (Election) पिछाडीवर आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. लिझ ट्रस यांनी सुनक यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर, टोरी सदस्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला. कारण ज्या पक्षाचा नेता सर्वाधिक मते घेईल, तो ब्रिटनचा (Britain) नवा पंतप्रधान होईल.

दोन्ही नेत्यांनी आकर्षक आश्वासने दिली

सुनक यांनी त्यांच्या प्रचारात वाढत्या महागाईला (Inflation) आळा घालण्याला प्राधान्य दिले. त्याच वेळी, परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी आश्वासन दिले की, 'जर माझी पंतप्रधान म्हणून निवड झाली तर, पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून कर कमी करण्याचा आदेश जारी करेन.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT