Queen Elizabeth II's Funeral Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II's Funeral: रशियासह या देशांना राणीच्या अंत्यसंस्काराचे निमंत्रण का मिळाले नाही?

राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागतिक नेते आणि इतर सेलिब्रिटी लंडनमध्ये दाखल होत आहेत. या यादीतील नेते कोण आहेत हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.

दैनिक गोमन्तक

Queen Elizabeth II's Funeral: राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागतिक नेते आणि इतर सेलिब्रिटी लंडनमध्ये दाखल होत आहेत. या यादीतील नेते कोण आहेत हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान, काही देश असे आहेत ज्यांना राणींच्या अंत्यसंस्कारासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही.रशियासह कोणत्या आणि किती देशांना राणीच्या अंत्यसंस्काराचे निमंत्रण पाठवले गेले नाही ते जाणून घेऊया.

या देशांना निमंत्रण मिळालेले नाही

खरे तर राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अंत्यसंस्कार लंडनमध्ये सोमवारी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. ब्रिटीश मीडियाच्या वृत्तानुसार, राणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे पाचशे लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी लंडनला पोहोचल्या आहेत. पण हे सहा देश आहेत जे राणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नाहीत.

- रशिया

- म्यानमार

- बेलारूस

- सीरिया

- व्हेनेझुएला

- अफगाणिस्तान

आमंत्रण का पाठवले नाही?

खरे तर या प्रकरणी ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफने आपल्या एका वृत्तात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. अहवालानुसार, युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाला निमंत्रण देण्यात आलेले नाही, असे ब्रिटनच्या राजनैतिक सूत्रांनी सांगितले. बेलारूस आणि म्यानमारने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला पाठिंबा दिला असला तरी दोघांनाही निमंत्रण दिलेले नाही.

लष्करी उठाव झाल्यापासून ब्रिटनचे आंग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारशी औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत, असेही वृत्त आहे. व्हेनेझुएला आणि सीरियाचे ब्रिटनशी पूर्ण राजनैतिक संबंध नसल्याने त्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, तेथील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या एकाही प्रतिनिधीला निमंत्रित करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT