Queen Elizabeth II Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती चिंताजनक, कुटुंबीयांना आले बोलावण्यात

Queen Elizabeth II: ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Britain Queen Elizabeth II health update: ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 96 वर्षीय राणी दीर्घकाळापासून आजारी असून स्कॉटिश राजवाड्यात राहत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याच वेळी, राणीचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स, त्यांची पत्नी कॅमिलासह त्यांना भेटायला आले आहेत. त्यांचा नातू प्रिन्स विल्यम्सही येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राणी एलिझाबेथ (Britain Queen Elizabeth II) यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 70 वर्षांपासून त्या सिंहासनावर विराजमान आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर स्कॉटलंडमधील (Scotland) बालमोरल कॅसलमध्ये उपचार सुरु आहेत. या ठिकाणी त्यांचे कुटुंबीयही पोहोचले आहेत. काही काळापासून त्या बकिंगहॅम पॅलेस सोडून इथे राहत होत्या. नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस (Prime Minister Liz Truss) यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, राणी काल एका बैठकीत त्यांच्या राजकीय सल्लागारांना भेटणार होत्या. परंतु डॉक्टरांनी (Doctors) त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बैठक रद्द करण्यात आली होती. बकिंगहॅम पॅलेसमधील गार्ड चेंजिंग सिरेमनीही रद्द करण्यात आली आहे. त्या जागी एक बोर्ड लावण्यात आला आहे. गेल्या एक वर्षापासून राणीला चालताना त्रास होत आहे. त्यांना क्वचितच उभा राहता येते.

राणीला कोरोनाची लागण झाली होती

फेब्रुवारीमध्ये राणी एलिझाबेथ यांना कोरोना (Corona) झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत सुधारली होती. परंतु त्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. आता बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेले निवेदन सामान्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT