Modi Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Putin lauds ​PM Modi: 'मोदी सच्चे देशभक्त, भारताचं भविष्य उज्वल'; पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक

मॉस्को येथील Valdai Club कॉन्फरन्समध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

“पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महान आणि सच्चे देशभक्त आहेत. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास मोदी सक्षम आहेत. भारताचे भविष्य उज्वल असून, जागतिक घडामोडींत त्यांची वाढती भूमिका असेल याची मला खात्री आहे,” असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) म्हणाले आहेत.

मॉस्को येथील Valdai Club कॉन्फरन्समध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन बोलत होते. पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे. रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. तसेच, मोदींच्या मेक इन इंडिया या संकल्पनेचे देखील कौतुक केले आहे. मोदींच्या मेक इन इंडिया ही संकल्पना आर्थिकदृष्ट्या तसेच, नैतिकदृष्ट्या महत्वाची असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांनी भारताच्या प्रगती देखील कौतुक केले आहे. 'ब्रिटिश राजवट ते प्रगत राष्ट्र अशी भारताची वाटचाल अतिशय थक्क करणारी आहे. दीड अब्ज लोकसंख्येचा देश सर्वकष विकासासाठी प्रयत्नशील आहे. असे गौरवोद्गार काढले. आमचे आणि भारताचे विशेष संबंध आहेत. आमच्यामध्ये कधीही कठीण समस्या निर्माण झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांना पाठिंबा दिला असून, सध्याही तेच करत आहोत. भविष्यातही असंच होईल याची माल खात्री आहे,' असं पुतीन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

RGP Goa Internal Differences: 'आरजी'मधील वादामुळे लोकांचा झाला भ्रमनिरास; वीरेश बोरकर गोवा राखण्यासाठी करणार युती?

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

SCROLL FOR NEXT