Private Aircraft Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Private Aircraft Crash: लॅंडिंग करताना विमान जमिनीवर कोसळले अन् आगीचा भडका, सर्वांचा मृत्यू Watch Video

Dominican Republic Plane Crash Video: डोमिनिका रिपब्लिकमधील ला रोमाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत भीषण आणि थरारक विमान अपघात झाला.

Manish Jadhav

Dominican Republic Plane Crash Video: डोमिनिका रिपब्लिकमधील ला रोमाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत भीषण आणि थरारक विमान अपघात झाला. एका खाजगी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करत असताना ते धावपट्टीवर कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. हा अपघात इतका भयानक होता की, कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण विमानाचे रुपांतर एका आगीच्या गोळ्यात झाले. या दुर्दैवी घटनेत विमानाचे मुख्य पायलट आणि को-पायलट या दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने, अपघात झाला तेव्हा या विमानात एकही प्रवासी स्वार नव्हता, ज्यामुळे खूप मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नोंदणीकृत असलेले हे 'गल्फस्ट्रीम G200' मॉडेलचे खाजगी जेट प्यूर्टो रिको येथील ऐबोनिटो एव्हिएशन या कंपनीकडून चालवले जात होते. हे विमान टेक्सासला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, ला रोमाना विमानतळावरुन टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच, विमान सुमारे 16 नॉटिकल मैल दूर असताना वैमानिकांना त्यात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचे जाणवले. विमानाचे इंजिन निकामी झाले किंवा हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

प्रसंगावधान राखून क्रू मेंबर्सनी विमान पुन्हा विमानतळावर आणून रनवे 29 वर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे लँडिंग अत्यंत वेगात आणि 'हार्ड लँडिंग' ठरल्यामुळे विमान धावपट्टीवरुन घसरत गेले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात (Accident) जीव गमावलेल्या दोन्ही वैमानिकांची ओळख एरिक जेवियर डियागो आणि रुडी गजल अशी पटली.

या अपघातात 'मेजर लीग बेसबॉल'चे दिग्गज स्टार खेळाडू यादियर मोलिना आणि त्यांचे कुटुंब बचावले. मोलिना यांनी स्वतः सोशल मीडियावर सांगितले की, हे खाजगी जेट त्यांना, त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना घेण्यासाठीच प्यूर्टो रिकोहून येत होते. जर विमान वेळेत पोहोचले असते, तर ते सर्वजण याच विमानाने प्रवास करणार होते, परंतु निसर्गाच्या कृपेने ते या भीषण अपघातातून वाचले. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विमानतळावरुन काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत आहेत आणि अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करत आहेत.

डोमिनिका रिपब्लिकच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने या गल्फस्ट्रीम जेट क्रॅशच्या चौकशीचे आदेश दिले. ला रोमाना हे ठिकाण जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून, डोमिनिका रिपब्लिकची जवळपास 1.16 कोटी लोकसंख्या आर्थिकदृष्ट्या पर्यटनावरच अवलंबून आहे. या विमानतळावर यापूर्वी 2021 मध्येही असाच एक भीषण खाजगी विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा झालेल्या या अपघातामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून अधिकारी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT