Autobiography Dainik Gomantak
ग्लोबल

Prince Harrys Book: 'मी 25 तालिबान्यांना मारलं होतं...', प्रिन्स हॅरी यांच्या खुलाशाने जगभरात खळबळ

Prince Harrys Autobiography: ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांचे आत्मचरित्र 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार होते, परंतु त्यातील काही भाग आधीच लीक झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Prince Harry's Comments: प्रिन्स हॅरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हॅरी यांचे आत्मचरित्र 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार होते, परंतु त्यातील काही भाग आधीच लीक झाला आहे. आता या लीक झालेल्या उताऱ्यांमधून समोर आलेल्या कथांनी ब्रिटनसह संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्या आठवणींमध्ये अफगाणिस्तानमधील सैनिक म्हणून आपले दिवस आठवले आहेत. यामध्ये प्रिन्स हॅरी यांनी 25 तालिबानींना मारल्याचा उल्लेख केला आहे. हॅरी यांच्या या खुलाशावरुन ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.

त्यांनी स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला

ब्रिटीश आर्मीचे माजी कर्नल रिचर्ड केम्प यांनी प्रिन्स हॅरी (Prince Harrys) ज्या लोकांशी लढला होते, त्यांचा विश्वासघात असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील सैन्यदलाचे माजी कमांडर केम्प यावरुन प्रिन्स हॅरीवर नाराज आहेत. ब्रिटीश आर्मी प्रिन्ससह आपल्या सर्व सैनिकांना शत्रूंमध्येही मानव पाहण्याचे प्रशिक्षण देते. मात्र हे सत्यापासून दूर आहे. एवढेच नाही तर प्रिन्स हॅरी यांच्या या खुलाशानंतर त्यांच्यासाठी धोका वाढला आहे, असेही केम्प म्हणाले.

यानंतर, अनेक दहशतवाद्यांमध्ये सूडाची भावना फोफावणार आहे. या सर्व गोष्टींमुळे आपली वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतला आहे.

ब्रिटिश सैनिकांना हल्ल्याची भीती

स्कायन्यूजशी बोलताना कर्नल केम्प म्हणाले की, 'अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) युद्धात भाग घेऊन प्रिन्स हॅरी यांनी स्वत:चा विशेष सन्मान केला होता. पण अशा कमेंट करुन त्यांनी तो गमावले आहे.' केम्प तिथेच थांबले नाही. प्रिन्स हॅरी यांच्या या वक्तव्यामुळे ब्रिटिश सैनिकांनाही धोका वाढला आहे, असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, आता त्यांच्यावर कुठेही हल्ला होऊ शकतो. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या युद्धात एक हात आणि पाय गमावलेले बेन मॅकबीन (Ben McBean) यांनीही हॅरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT