Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi Mother Hiraba Passes Away: पाक पंतप्रधांनाचा PM मोदींना शोक संदेश, 'आई गमावण्यापेक्षा मोठे नुकसान...'

Shahbaz Sharif Pay Tribute: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Demise of PM Narendra Modi's mother Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, 'हीराबेन मोदी यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनानंतर सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसाठी परदेशातूनही सहानुभूतीचे संदेश येत आहेत. शेजारील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही पीएम मोदींच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'आई गमावण्यापेक्षा मोठे नुकसान नाही'

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शरीफ यांनी ट्विट करत म्हटले की, 'आई गमावण्यापेक्षा मोठे नुकसान नाही. पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो.'

तसेच, पीएम मोदींच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. या दु:खाच्या काळातही, पंतप्रधान मोदींनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित काम करण्याचे ठरवले आहे, इतकेच नाही तर त्यांनी भाजपचे (BJP) सर्व मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना त्यांचे काम सुरु ठेवण्यास सांगितले आहे. पीएम मोदी म्हणाले की, 'या दु:खाच्या वेळी तुमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही सर्वजण तुमचा पूर्वनियोजित कार्यक्रम सुरु ठेवा.'

दुसरीकडे, पंतप्रधान मोदींचे जगभरातील अनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध आहेत. अशा परिस्थितीत या कधीही भरुन न येणार्‍या नुकसानीनंतर लोक पीएम मोदींकडे शोक व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT