Prime Minister Narendra Modi & US President Joe Biden historical visit today, Terrorism is big point in meeting Dainik Gomantak
ग्लोबल

मोदी, बायडन यांच्यात आज ऐतिहासीक बैठक,दहशहतवादासह अनेक मुद्द्यांवर चर्चा

सर्वांचे डोळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि पीएम मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या बैठकीवर आहेत, ज्यात दहशतवादासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अमेरिका दौऱ्याचा (USA Visit) आज दुसरा दिवस आहे आणि तो खूप खास असणार आहे कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांची आज भेट होणार आहे, ही बैठक भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता होणार आहे. दोन्ही नेते पहिल्यांदा भेटत असून संपूर्ण जगाच्या नजरा या बैठकीवर आहेत.(Prime Minister Narendra Modi & US President Joe Biden historical visit today, Terrorism is big point in meeting)

या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांनाही भेटले आहेत आणि या जागतिक नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे . आता सर्वांचे डोळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि पीएम मोदी यांच्या बैठकीवर आहेत, ज्यात दहशतवादासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

मोदी आणि बायडन बैठकीत या मुद्द्यांवर होईल चर्चा

सध्या जगात अनेक राजकीय उलथापालथ झाली आहे, जगातील दोन मोठ्या लोकशाहीचे प्रमुख या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कशी रणनीती आखतात. याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे ते मुद्दे नेमके काय असणार आहेत -

  • सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा

  • जगभरातील दहशतावाद्यांच्या वाढत्या नेटवर्कचा प्रभाव

  • अफगाणिस्तानात निर्माण झालेली सद्यस्थिती

  • सुरक्षा आणि सहकार्याचे मुद्दे

  • कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी नवीन आव्हाने

या वर्षाच्या सुरुवातीला जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून दोन्ही नेत्यांनी तीन वेळा चर्चा केली आहे. पण एकदाही चर्चा समोरासमोर झाली नाही हेही महत्वाचे आहे. या दोन्ही नेत्यांनी तीन शिखर परिषदांनाही हजेरी लावली आहे, असे मानले जाते की नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे भारत आणि अमेरिकेच्या पुढील तीन वर्षांसाठी ब्लूप्रिंट तयार होईल.

व्यापारी संबंधांव्यतिरिक्त चीनबद्दलचे अमेरिकेचे धोरण भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी बायडन यांनी एक वक्तव्य भारतासाठी आनंदाचे चिन्ह देत आहे कारण तयांनी शीतयुद्धापासून दूर राहण्याविषयी अमेरिका सकारत्मक असल्याचे सांगितले होते.

जो बायडन यांना भेटण्यापूर्वी पीएम मोदी आणि कमला हॅरिस यांची बैठक पार पडली आहे . या दोन नेत्यांचीही ही पहिली बैठक होती, ज्यात कोरोना, दहशतवाद, अफगाणिस्तानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे . कमला हॅरिस यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून त्यांनी दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये कशा सक्रिय आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची गरज आहे असे स्पष्ट मत मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT