Bushra Bibi & Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इम्रान खान यांची पत्नी सरकार वाचवण्यासाठी जाळतेय जिवंत कोंबड्या!

पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अशा स्थितीत खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी खान चर्चेत आली आहे. इम्रान सरकार वाचवण्यासाठी बुशरा बीबी जिवंत कोंबड्या जाळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बुशरा बीबी जादूटोणा करत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी केला आहे. शरीफ म्हणाले की, 'इम्रान खान (Imran Khan) यांच्या बनीगालामध्ये कित्येक टन मांस जळाले जात आहे.' बुशरा बीबी (Bushra Bibi) तिच्या रहस्यमयी व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आहे. (Prime Minister Imran Khan's third wife Bushra Bibi has come under fire in Pakistani politics)

दरम्यान, सोमवारी नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे. अशा स्थितीत इम्रान यांना आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे 372 सदस्य आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे 155 खासदार आहेत. मात्र बहुमतासाठी इम्रान यांना 172 खासदारांची गरज आहे. अशा स्थितीत इम्रान खान यांच्यासाठी बहुमत मिळवणे कठीण काम असेल हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांचे सरकार वाचवण्यासाठी बुशरा बीबीने जादूटोणा सुरु केल्याचे बोलले जात आहे.

कोण आहे बुशरा बीबी?

इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी हिचा जन्म 16 ऑगस्ट 1974 रोजी झाला. पाकिस्तानच्या पाकपट्टणमध्ये जन्मलेल्या बुशरा बीबी या पंजाब प्रांतातील राजकीय कुटुंबातून येतात. पाकपट्टण शहराची ओळख 12व्या शतकातील सुफी संत बाबा फरीद यांचे तीर्थस्थान म्हणून केली जाते. इम्रान खान आणि बुशरा बीबी यांची भेट बाबा फरीद यांच्या दर्ग्यावर झाली होती. बुशरा बीबीने इम्रान खान यांच्या आधी खवर मनेकाशी लग्न केले होते. त्यांना तीन मुली आणि दोन मुलांसह पाच मुले आहेत. यानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मनेका हे पाकिस्तानातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबातून आलेल्या वरिष्ठ कस्टम अधिकारी होते. असे म्हटले जाते की, बुशरा बीबी या आधुनिक विचारांच्या महिला होत्या, परंतु त्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला.

इम्रान खान जेव्हा पाकपट्टण बाबा फरीद यांच्या दर्ग्याला जायचे तेव्हा ते बुशरा बीबीच्या घरीही राहायचे. 2018 मध्ये इम्रान खान यांनी लाहोरमध्ये बुशरा बीबीशी लग्न केले. लग्नानंतर सहा महिन्यांनी इम्रान पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान झाले. बुशरा बीबी या सूफी धर्म मानणाऱ्या आहेत. त्यांच्याकडे असामान्य अलौकिक क्षमता असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये त्यांना पिंकी 'पीरनी' किंवा पिंकी बीबी या नावाने ओळखले जाते. इम्रान बुशराकडून 'आध्यात्मिक सल्ला' घेतात, असेही म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT