Narendra Modi & Volodymyr Zelenskyy  Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची पंतप्रधान मोदींशी (Narendra Modi) चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी युद्ध सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी संवाद साधला आहे. युक्रेनच्या पंतप्रधानांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. चीन आणि UAE प्रमाणे भारताने UN सुरक्षा परिषदेत निंदा प्रस्तावादरम्यान मतदान केले नाही, तर 11 सदस्यांनी रशियाच्या (Russia) विरोधात मतदान केले. सुरक्षा परिषदेत भारताच्या भूमिकेचे रशियाने कौतुक केले आहे. (President of Ukraine Volodymyr Zelensky interacts with Prime Minister Modi)

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली आहे. युक्रेन संकटावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारताने मतदान केले नाही. सर्व देशांनी मिळून यातून मार्ग काढावा. त्याचबरोबर राजनैतिक संवादाला चालना देण्याचे आवाहन देखील भारताकडून करण्यात आले. संवादाचे पर्याय खुले ठेवण्यात आला असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.

तसेच, अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, भारताने ठरावावर मत दिलेले नाही. परंतु देशांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. 'हिंसा आणि शत्रुत्व' त्वरित संपवण्याची मागणी यावेळी भारताने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT