Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिका-तैवान करार बद्ध! चीनला धक्का

अमेरिका आणि तैवान यांच्यातील US$ 100 दशलक्ष क्षेपणास्त्र कराराला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिका आणि तैवान यांच्यातील US$ 100 दशलक्ष क्षेपणास्त्र कराराला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे. चीनचा वाढता दबाव पाहता तैवानची क्षेपणास्त्रांची संरक्षण यंत्रणा मजबूत करणे हा या क्षेपणास्त्र कराराचा उद्देश आहे. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करून या क्षेपणास्त्र कराराला मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे.

चीनची (Chaina) राजधानी बीजिंग (Beijing) येथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, त्यामुळे देशात राष्ट्रवादाची भावना शिगेला पोहोचली, खेळ संपल्यानंतर चीनची तैवानबाबतची भूमिका आणखी कठोर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्याला आपल्या अधिकारक्षेत्रात आणण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अलीकडच्या काही महिन्यांत चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीतून उड्डाण केले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान (Zhao Lijian) यांनी मंगळवारी सांगितले की, तैवानला अमेरिकेची शस्त्रे विक्री... चीनच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांना गंभीरपणे हानी पोहोचते आहे. हा करार तैवानला सध्याची हवाई-संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि तैवानला अमेरिकेकडून मिळत असलेली प्रगत अमेरिकन क्षेपणास्त्रे तैनात करण्यात मदत करण्यासाठी आहेत. या कराराला मान्यता दिल्याबद्दल तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT