Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

खेळ संपला! 'शाहबाज शरीफ असतील पाकिस्तानचे नवे पंतप्रधान'

मरियम म्हणाल्या की आहे की इम्रान खान! तुमचा खेळ संपला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे Pakistan पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाचे प्रमुख शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे करणार असल्याचे म्हटले जात आहे. पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज शरीफ यांनी ही माहिती दिली आहे. ()

मरियम म्हणाली, इम्रान खान गेम हरले आहेत

मरियम म्हणाल्या की आहे की इम्रान खान! तुमचा खेळ संपला आहे. सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ अधिकृतपणे तुटले आहे. एका पाकिस्तानी वृत्तपत्र द ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी असे म्हटले आहे की इम्रान खान यांना देखील माहित आहे की आता कोणीही त्याच्या बचावासाठी येणार नाहीये कारण तो गेम त्यांनी गमावला आहे.

इस्लामाबाद (Islamabad) उच्च न्यायालयाबाहेर (High Court) पत्रकार परिषदेत मरियम नवाज यांनी इम्रान खानयांच्यावर ताशेरे ओढले की, इम्रान खानला विश्वास आहे की आपल्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जात आहे, पण ते स्वत:विरुद्ध कट रचत आहे. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले असते तर लाखो लोकांची जमवाजमव करण्याची गरज आता पडली नसती.

पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी शुक्रवारी नॅशनल असेंब्लीची बैठक बोलवली जाणार आहे. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयासमोर अविश्वास प्रस्ताव मांडला आणि आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला खान यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे.

अविश्वास प्रस्तावानंतर इम्रान खान यांना सत्तेतून हद्दपार केले जाऊ शकते, असे अहवालात म्हटले गेले आहे कारण त्यांच्याच पक्ष पीटीआयमध्ये फूट पडली आहे आणि पक्षाचे सुमारे 20 खासदार इम्रान खानवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच इम्रान खानचे सहयोगी पक्षही इम्रान खान सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकतात असेही चिन्ह दिसून येत आहे. अशा स्थितीत इम्रान खान यांना इस्लामाबादचे सिंहासनही सोडावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

SCROLL FOR NEXT