Nawaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

''आ अब लौट चले'', नवाझ शरीफ पाकिस्तानमध्ये करणार एन्ट्री !

पाकिस्तानमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून गेल्यानंतर आता राजकीय परिस्थिती बदलत आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून गेल्यानंतर आता राजकीय परिस्थिती बदलत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझने सरकार स्थापन केले आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ पंतप्रधान बनले. पाकिस्तानच्या सत्तेवर शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तीन वेळा पंतप्रधान राहीलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचे लंडनहून परतणे निश्चित मानले जात होते, मात्र त्याबाबत केवळ अटकळ बांधली जात होती. (PML N leader Mian Javed Latif has said that Nawaz Sharif will return to Pakistan after Eid)

दरम्यान, आता पीएमएलएनचे नेते मियां जावेद लतीफ यांनी नवाझ शरीफ ईदनंतर पाकिस्तानात (Pakistan) परतणार असल्याचे म्हटले आहे. मियाँ जावेद लतीफ यांनाही शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले आहे. पीएमएलएन न्यायालयावर विश्वास ठेवते आणि त्यांचा निर्णय मान्य करेल, असे लतीफ यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. 72 वर्षीय माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्याला संविधान आणि कायद्यानुसार सामोरं जावं लागणार आहे.

नव्याने स्थापन झालेल्या शाहबाज सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत जावेद लतीफ म्हणाले की, ''पाकिस्तान पीपल्स पार्टीने ( PPP) बिलावल भुट्टो झरदारी यांचे नाव मंत्री करण्यासाठी पुढे केले आहे. बिलावल भुट्टो झरदारी हे पुढील परराष्ट्र मंत्री असतील.''

ते म्हणाले की, ''बिलावल लंडनहून परतल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतील. पीपीपीचे सरचिटणीस फरहातुल्ला बाबर यांनीही बिलावल यांच्या लंडन भेटीला दुजोरा दिला आहे. बिलावल भुट्टो हे नवाझ शरीफ यांच्याशी आघाडी सरकार आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लंडनला गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.''

शिवाय, या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवाझ शरीफ यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नवाझ शरीफ यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. आता शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर गृह मंत्रालयाने नवाझ शरीफ आणि त्यांचे नातेवाईक इशाक दार यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT