PM Modi  Twitter
ग्लोबल

PM मोदींचे टोकियोमध्ये 'जय श्री राम' च्या घोषणेने जोरदार स्वागत

PM Modi In Quad Summit: क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान जपानला गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

टोकियोच्या विमानतळावरून पंतप्रधान मोदी थेट हॉटेल न्यू ओटानी येथे पोहोचले, जिथे भारतीय लोकांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. यावेळी 'जय श्री राम' आणि मोदींच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच पीएम मोदींनी लहान मुलांशी संवादही साधला. भारतीय वेळेनुसार, PM मोदींचे विमान पहाटे 4:20 वाजता टोकियोमध्ये उतरले. क्वाड समिटमध्ये (Quad Summit) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांशी चर्चा करतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी तीन मोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक घेणार आहेत. (PM Modi In Quad Summit)

पंतप्रधान मोदींचे (PM Modi) दोन दिवसांचे वेळापत्रक खूप व्यस्त स्वरूपाचे आहे. जी सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होईल. सॉफ्टबँक ग्रुप आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या अधिका-यांच्या भेटीव्यतिरिक्त, अनेक व्यावसायिक नेत्यांच्या भेटीही घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.

* दुपारी - 1.45

इंडो-पॅसिफिक आर्थिक भागीदारीची सुरुवात

* दुपारी - 2.45 वा

जपानी व्यवसाय जगासह गोलमेज परिषद

संध्याकाळी - 4 वा

इंपीरियल हॉटेलमध्ये भारतीय समुदायासोबत बैठक

24 मे रोजी मोदी टोकियोमध्ये क्वाड नेत्यांसोबत होणाऱ्या शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज चर्चा करणार आहेत.

द्विपक्षीय चर्चेदरम्यान गुंतवणूक, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यासह अनेक मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे. क्वाड फोरमचे भविष्य आणि त्याची परिणामकारकता या दृष्टीनेही टोकियो बैठक महत्त्वाची मानली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देश आर्थिक आणि सुरक्षा समस्यांना तोंड देत आहेत. अशा स्थितीत अमेरिका-जपान-भारत आणि ऑस्ट्रेलियाचे नेते ठोस परिणाम देणाऱ्या योजना वाढवण्याचा प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT