Paris Abortion Law: Dainik Gomantak
ग्लोबल

Paris Abortion Law: पॅरिसमधील रस्त्यावर अचानक टॉपलेस झाल्या महिला; पाहा व्हायरल व्हिडिओ

1 फेब्रुवारी रोजी फ्रेंच सिनेटमध्ये गर्भपात विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रविवारी फेमेन या स्त्रीवादी गटाच्या 6 महिला कार्यकर्त्या टॉपलेस होऊन रस्त्यावर निषेध करतांना दिसल्या. गर्भपात आणि इच्छामरणाच्या विरोधात सुरू असलेल्या निषेधासाठी या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. यानंतर फेमेन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्याची सध्या सुटका करण्यात आली आहे.

  • फ्रान्सच्या संविधानात गर्भपाताचा समावेश करण्याची मागणी

फिमेन (FEMEN) ने 22 जानेवारी रोजी 'मार्च फॉर लाइफ' आंदोलनाचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी गर्भपाताचा फ्रेंच संविधानात समावेश करण्याची मागणी केली होती.

फ्रान्सच्या सिनेटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी गर्भपात (Abortion) विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. या विधेयकाला फ्रान्सच्या विधानसभेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

  • गर्भपाताच्या विरोधात आंदोलन

फिमेन ही एक स्त्रीवादी संघटना आहे. ज्यांनी गर्भपाताला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी केली आहे. 22 जानेवारी रोजी हजारोंच्या मोठ्या लोकसंख्येने पॅरिस शहरात गर्भपात आणि इच्छामरणाच्या विरोधात आंदोलन काढले.

हे आंदोलन शेवटच्या मुक्कामावर असताना फेमिन कार्यकर्त्यांनी टॉपलेस होउन रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले.

या कार्यकर्त्यांच्या हातात “गर्भपात पवित्र आहे” असे काही पोस्टर्स होते. तसेच फेमेनच्या 5 महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. एका व्हिडिओमध्ये (Video) एक महिला पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

  • हे विधेयक 1 फेब्रुवारीला सिनेटमध्ये मांडण्यात येणार

नोव्हेंबरच्या अखेर फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले. त्यानंतर आता हे विधेयक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेटमध्ये येणे अपेक्षित आहे.

लैंगिक आणि प्रजनन अधिकारांना घटनात्मक दर्जा देणे हा या विधेयकाचा आधार आहे. यामुळे महिलांचे अधिकार मजबुत होतील, अशी आशा अनेक फ्रेंच महिला संघटनांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समध्ये याविरोधात आंदोलन सुरू आहेत. 22 जानेवारीला पॅरिसमध्ये मोठे आंदोलनही याविरोधात झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT