300 Taliban Fighter killed in Panjshir Dainik Gomantak
ग्लोबल

पंजशीरमध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा; तालिबानला मोठा धक्का

Panjshir: पंजशीरच्या बंडखोरांनी फक्त 300 तालिबान्यांना ठारच मारले नाही, तर अनेक तालिबान्यांना त्यांनी पकडून ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

Afghanistan: तालिबानने (Taliban) बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधीनी काबूलवर कब्जा केला हे सर्व जगाने पाहिलं, मात्र अफगाणिस्तानमध्ये एक असा एक भाग आहे जिथे कब्जा करण्याचे तालिबान्यांचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. 20 वर्षांपूर्वी देखील ते स्वप्न अधुरेच होते आणि आजही तालिबानी तिथल्या मातीत पाय ठेऊ शकले नाही. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सुद्धा तालिबान्यांच्या ताब्यात न आलेला हा प्रदेश म्हणजे उत्तर आघाडीचे माजी कमांडर अहमद शाह मसूद यांचा गड...अर्थात पंजशीर खोरे (Panjshir Valley). याच पंजशीर खोऱ्यात 300 तालिबांन्यांना ठार केले असल्याची माहिती समोर आली आहे. हे जाणुन घेताना आश्चर्य वाटेल की, तालिबानने देशाच्या अनेक भागांवर कब्जा केला असेल मात्र आजही दहशतवादी असणारे तालिबानी काबूलजवळील पंजशीरवर हल्ला करणयापुर्वी हजार वेळा विचार करतात.

अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर सर्वात आधी बंड पुकारणारे लोक याच पंजशीर खोऱ्यातले लोक होते. पंजशीरच्या बंडखोरांनी केवळ 300 तालिबान्यांना ठारच मारले नाही, तर अनेक तालिबान्यांना त्यांनी पकडून ठेवले आहे. स्थानिक पत्रकारांनी या तालिबानींची छायाचित्रे ट्विट केली आहेत. त्यामध्ये लिहिले की 'तालिबानविरोधी चळवळीने आपल्याला हे लोक बागलाण प्रांतातील अंद्राबमध्ये झालेल्या संघर्षाच्यावेळी पकडलेले हे तालिबानी कैदी आहेत.'

अमरुल्ला सालेह तालिबान्यांना म्हणाले, ‘पुन्हा भेटू’

स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीलाहू राष्ट्रपती घोषित केलेल्या अमरुल्ला सालेह यांनी देखील ट्वीट केले - 'अंद्राब व्हॅलीच्या अंबुश झोनमध्ये अडकल्यानंतर आणि मोठ्या कष्टाने एका कोपऱ्यातून बाहेर पडल्यानंतर, तालिबानने पंजशीरच्या प्रवेशद्वारावर फोर्स तैनात केली आहे. मात्र, या दरम्यान, बंडखोर सैन्याने सालंग महामार्ग बंद केला आहे. हा तो मार्ग ज्यापासून तालिबान्यांनी दुर राहीलं पाहिजे. पुन्हा भेटू...'

1990 च्या दशकात जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता, तेव्हाही तालिबान पंजशीरवर राज्य करु शकला नाही. ‘पंजशीर’ हे अफगाणिस्तानमधील एकमेव क्षेत्र आहे जिथे लोक तालिबानच्या दहशतीविरोधात बंडाचा झेंडा उभारता आहेत. पं

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे सुद्दा याच पंजशीर प्रांतातले आहेत, 1980 ते 2021 पर्यंत तालिबानी एकदाही पंजशीरवर ताबा मिळवु शकले नाहीत, यावरुन तालिबान्यांच्या मनात असलेला पंजशीरचा दरारा दिसुन येतो. हिंदुकुश पर्वताजवळ असलेल्या याठीकाणचे लोक हे गुरिल्ला वॉरफेअरच्या मदतीने युद्ध लढण्यासाठी पारंगत असल्याचे म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT