Pakistan's Prime Minister Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, पक्षाचे 50 मंत्री झाले 'बेपत्ता'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव काही दिवसांसाठी पुढे ढकलला गेला असला तरी अडचणी मात्र कायम आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव काही दिवसांसाठी पुढे ढकलला गेला असला तरी अडचणी मात्र कायम आहेत. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे 50 मंत्री (Of federal and provincial governments) बेपत्ता असल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमधून समोर येत आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक जिवनात दिसलेले नाहीत. एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, '25 फेडरल आणि प्रांतीय सरकारांचे सुमारे 25 सल्लागार देखील बेपत्ता झाले आहेत.' दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) अजूनही बहुतांश मंत्र्यांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत. पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, फवाद चौधरी, ऊर्जा मंत्री हमद अजहर असे अनेक मंत्री खान यांच्यासोबत दिसत आहेत. (Pakistan's Prime Minister Imran Khan's 50 ministers 'missing', the first blow of no-confidence motion)

दरम्यान, इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव 28 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तानचे प्रतिनिधी आज इम्रान खान यांची भेट घेणार असल्याचे एआरवायच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पक्ष इम्रान खान यांच्या सरकारला पाठिंबा देत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी इम्रान खान यांना अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निवडणुका घेण्याचा सल्ला दिला आहे. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढली आहे. याशिवाय यास सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) ची भूमिका म्हणून पाहिले जाऊ नये, असेही रशीद म्हणाले आहेत. एका आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे की, रशीद यांनी चालू राजकीय संकट संपवण्यासाठी मध्यावधी निवडणुकांची वकिली केली आहे.

तसेच, पुढील सार्वत्रिक निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. रशीद पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 3 किंवा 4 एप्रिल रोजी मतदान होऊ शकते. 28 मार्च रोजी नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.''

शिवाय, अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतर तीन ते सात दिवसांच्या दरम्यान मतदान होते. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय तहकूब करण्यात आले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी सांगितले की,''पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे खासदार खयाल जमान यांच्या निधनामुळे हे अधिवेशन सुरु झाले आहे. 28 मार्च संध्याकाळपर्यंत स्थगित असणार आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT