Pakistan PM Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Congratulates PM Modi: तिसऱ्यांदा PM पदाची शपथ घेणाऱ्या मोदींचे पाकिस्तानकडून अभिनंदन; काय म्हणाले शाहबाज शरीफ?

Pakistan Congratulates PM Modi: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Manish Jadhav

Pakistan Congratulates PM Modi: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. जवळपास तीन महिने चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने 4 जून रोजी निकाल जाहीर केला होता. निकालात एनडीएचा विजय झाल्यानंतर जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. मात्र पाकिस्तानने अभिनंदन केले नाही. दरम्यान, काल ​​पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर आज म्हणजेच सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, "भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन."

याआधी शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांना विचारण्यात आले की, पाकिस्तानने नरेंद्र मोदींचे त्यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन का केले नाही? या प्रश्नास उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘भारतात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु असल्याने नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणे घाईचे होईल.’

दुसरीकडे, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी 'X' वर लिहिले की, 'मी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या विजयाबद्दल मनापासून अभिनंदन करतो, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली प्रगती आणि समृद्धी भारतीय लोकांचा विश्वास दर्शवते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: ईशान किशन ठरला 'हिरो', गोलंदाजांनी मोडलं पाकड्यांचं कंबरडं; हायहोल्टेज सामन्यात भारताचा 61 धावांनी दणदणीत विजय

IND vs PAK: पाकड्यांची ना बॅालिंग चालली, ना बॅटिंग! टीम इंडियाच्या 'डबल अटॅक'ने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 61 धावांनी पराभव

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT