Pakistani hackers using three apps to target Indian Android users. Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीय अँड्रॉइड यूजर्संना टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्सकडून 'या' तीन अ‍ॅप्सचा वापर

नुकतीच एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे भारतीय अँड्रॉइड युजर्सना स्मार्टफोन वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पाकिस्तानमधील काही हॅकर्स यूट्युबसारख्या अ‍ॅप्सचा वापर करुन फोन हॅक करत आहेत.

Ashutosh Masgaunde

Pakistani hackers using three apps to target Indian Android users:

तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर त्यासंबंधीच्या समस्याही वाढत आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या सायबर गुन्ह्यांची आहे, ज्याचा परिणाम भारतातील तसेच जगभरातील लोकांवर आणि सरकारांवर होत आहे.

अलीकडेच, एक घटना समोर आली आहे ज्यात पाकिस्तानशी संबंधित एक संशयित 'Transparent Tribe', टोळी CapraRAT मोबाइल रिमोट एक्सेस ट्रोजन (RAT) व्हायरल करत आहे. यासाठी ते हुबेहूब यूट्यूब सारखे दिसणारे अँड्रॉइड अ‍ॅप वापरत आहेत.

या धोकादायक अ‍ॅप्समध्ये com.Base.media.service, com.moves.media.tubes, com.videos.watches.share यांचा समावेश आहे.

सायबर सिक्युरिटी कंपनी सेंटिनेलवनने अहवाल दिला की CapraRAT टूलसेट काश्मीर-संबंधित बाबींची माहिती गोळा करण्यासाठी स्पीयर-फिशिंग टार्गेट करण्यासाठी वापरला जातो.

यासोबतच पाकिस्तानशी संबंधित बाबींवर काम करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठीही याचा वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम अँड्रॉइड डिव्हाईसवर होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

हा हॅकर ग्रुप भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनयिक माहिती चोरण्यासाठी ओळखला जातो.

एवढेच नाही तर संशोधक अ‍ॅलेक्स डेलामोटचे मत आहे की CapraRAT हे एक धोकादायक साधन आहे, ज्याद्वारे हॅकर्स Android उपकरणांचा अधिक डेटा त्यांच्या नियंत्रणात ठेवू शकतात.

CapraRAT एक Android फ्रेमवर्क आहे, ज्यामध्ये इतर कोणत्याही अ‍ॅपमध्ये RAT वैशिष्ट्ये लपवण्याची क्षमता आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर सापडणार नाहीत.

ट्रान्सपरंट ट्राइब हॅकर्स हे अँड्रॉइड अ‍ॅप्स Google Play Store च्या बाहेर ठेवतात, यूजर्सना ते इन्स्टॉल करण्यासाठी एटोमॅटीक वेबसाइट आणि सोशल इंजिनिअरिंग तंत्रांवर अवलंबून राहण्यास भाग पाडतात.

सोप्या भाषेत, ते लोकप्रिय Android अ‍ॅप्सच्या बनावट व्हर्जनच्या एपीके फाइल्स तयार करतात.

या धोकादायक अ‍ॅप्समध्ये com.Base.media.service, com.moves.media.tubes, com.videos.watches.share यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT