Pakistan Court  Dainik Gomantak
ग्लोबल

लहान मुलांचे लैंगिक शोषण करून बनवायचे घाणेरडे व्हिडिओ; कोर्टाने सुनावली 50 वर्षांची शिक्षा

तिघेजण मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

Pakistan: लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पाकिस्तानातील एका न्यायालयाने शुक्रवारी तिघांना 50 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने आणखी एका दोषीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे लोक मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.

सप्टेंबर 2021 मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्नोग्राफी घोटाळ्याचा चारही जण दोषी भाग होते. या सर्वांविरुद्ध पाकिस्तानी पंजाबच्या लाहोर सत्र न्यायालयात खटला सुरू होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश गझला यास्मिन यांनी तारिक जावेद, रियासत अली आणि मुहम्मद आसिफ या तिघांना लहान मुलांवर बलात्कार आणि त्यांचे व्हिडिओ बनवल्याबद्दल 50-50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. असे न्यायालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी वृत्तपत्राला सांगितले आहे.

याशिवाय न्यायाधीश साहिबा यांनी हाफिज एहतशाम नावाच्या व्यक्तीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने तारिक जावेद, रियासत अली आणि मुहम्मद आसिफ यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर हाफिज एहतशामला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना तपासादरम्यान त्यांना हाफिज एहतशामच्या फोनमध्ये 46 अश्लील व्हिडिओ आणि अन्य तीन आरोपींचे यूएसबी ड्राइव्ह सापडले. या व्हिडिओंमध्ये चौघेही 8 ते 12 वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहेत. असे पोलिसांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांपैकी एक हा साहिवाल शहरातील मुख्य बस टर्मिनलवर विक्रेता होता. हा माणूस येथील पळून जाणाऱ्या आणि भिकाऱ्या मुलांना आमिष दाखवून लग्नमंडपात घेऊन जायचा. या लग्नमंडपात हा व्यक्ती त्याच्या तीन साथीदारांसह जघन्य गुन्हे करत असे. असे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT