Explosion Dainik Gomantak
ग्लोबल

...तो बॉल नसून रॉकेट लॉन्चरचं शेल आहे हे कळायच्या आत खेळ खल्लास; दुर्दैवी घटनेत 8 जण ठार

Pakistan News: पाकिस्तानातील सिंधमध्ये रॉकेट लॉन्चरच्या शेलचा स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Pakistan News: पाकिस्तानातील सिंधमध्ये रॉकेट लॉन्चरच्या शेलचा स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. कंधकोट जिल्ह्यात हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार मुलांचाही समावेश असून, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना कंधकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुले घरात रॉकेट लॉन्चरच्या शेलशी खेळत होती, त्यादरम्यान रॉकेटच्या शेलचा स्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुले, दोन महिला आणि एका व्यक्तीचा समावेश आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून सर्व जखमींना कंधकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

लहान मुले रॉकेट लाँचरच्या शेलशी खेळत होती

कंधकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहिल खोसा यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुले बाहेर खेळत असताना त्यांना जमिनीवर रॉकेटचा शेल पडलेला दिसला. मुलांनी खेळण्यासाठी रॉकेटचे शेल घरी आणले आणि खेळायला सुरुवात केली.

दरम्यान, रॉकेटच्या शेलचा स्फोट होऊन घरामध्ये मोठा स्फोट झाला, या स्फोटात घरात उपस्थित 8 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात गोंधळाचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

सिंधच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी आयजीकडून अहवाल मागवला

रॉकेट शेलच्या स्फोटाची माहिती मिळताच सिंधचे काळजीवाहू मुख्यमंत्री मकबूल बकर यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी महानिरीक्षक डॉ. रिफत मुख्तार यांच्याकडून घटनेचा अहवाल मागवला आहे.

यासोबतच रॉकेट गावात कसे पोहोचले, या भागात शस्त्रास्त्रांची तस्करी होते का, गावात सध्या दहशतवाद्यांचे (Terrorists) समर्थक आहेत का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT