Pakistan Road Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Pakistan: पाकिस्तानच्या वायव्येकडील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील दियामेर जिल्ह्यात असलेल्या काराकोरम राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Pakistan Road Accident: पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील दियामेर जिल्ह्यात असलेल्या काराकोरम राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बस रावळपिंडीहून हुंजाकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

स्थानिक पोलीस (Police) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये किती लोक होते हे अद्याप कळू शकलेले नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत लोकांची माहिती देताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दरम्यान, या भीषण अपघाताबाबत (Accident) बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री हाजी गुलबर खान यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT