PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

भारतासोबत एकत्र काम करण्याची इच्छा: शाहबाज शरीफ

पाकिस्तानमधील सत्ताबदलानंतर भारतासोबतचे संबंधही बदलण्याची चिन्हे दिसून आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील (Pakistan) सत्ताबदलानंतर भारतासोबतचे (India) संबंधही बदलण्याची चिन्हे दिसून आहेत. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून दोन्ही देशांच्या वादग्रस्त मुद्द्यांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहबाज यांचे हे पत्र पीएम मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर म्हणून आले. (Pakistan PM Shahbaz Sharif has said he wants to work with India)

शाहबाज यांनी पीएम मोदींचे आभार मानत लिहिले की, प्रदेशात शांतता आणि स्थिरता तसेच जम्मू-काश्मीरसह (Jammu-Kashmir) सर्व वादग्रस्त प्रश्न शांततेने सोडवले जाऊ शकतात तसेच भारत आणि पाकिस्तानमधील शांततापूर्ण संबंध नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले होते, पंतप्रधान बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पीएम मोदी म्हणाले होते की, तुम्हाला पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. हा प्रदेश दहशतवादमुक्त करून शांतता आणि स्थैर्यासाठी तुम्ही त्यावर काम कराल अशी भारताची अपेक्षा आहे. याद्वारे आपण आव्हाने पेलून आपल्या नागरिकांना चांगले जीवन देऊ शकता.

याला उत्तर देताना शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि म्हणाले की, 'पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंधच हवे आहेत. काश्मीरसह दोन्ही देशांमधील अनेक प्रश्न शांततेने सोडवण्याची आता गरज आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने केलेले बलिदान सर्वांच्याच लक्षात आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर शाहबाज यांनी आपल्या पहिल्या भाषणातही काश्मीरचा स्पष्टपणे उल्लेख केला होता. त्यानंतर ते म्हणाले होते की, मला भारतासोबत शांततेचे संबंध हवे आहेत, जी काश्मीर वादावर तोडगा निघेपर्यंत शक्य नाहीये. शाहबाज यांनी यापूर्वीही अनेक वेळा काश्मीरचा न चुकता उल्लेख केला आहे.

भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत: शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ यांनी अनेकदा पाकिस्तानी पंजाब आणि भारतीय पंजाबमध्ये एकत्र काम करण्याबाबत बोलले आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. 2017 मध्ये, पंजाब आणि उत्तर भारतात धुक्याची समस्या सुरू होती, तेव्हा शाहबाज शरीफ यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना पत्र देखील लिहिले होते. त्यात त्यांनी धुराची समस्या आणि प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT