Pakistan occupied Kashmir protests Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Protest: ..पाकिस्तान पुन्हा पेटलं! काश्मीरमध्ये सरकारविरुद्ध निदर्शने; आंदोलक-पोलिसांत गोळीबार, 2 नागरिक ठार

Pakistan occupied Kashmir: गेल्या चोवीस तासांपासून पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये आंदोलन पेटले असून बाजारपेठ बंदचे आवाहन करत असताना चक्का जामने आंदोलनाने तणावात भर पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

इस्लामाबाद: पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारविरोधात उग्र निदर्शने सुरू झाली असून यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत आणि गोळीबारात दोन जण ठार तर २२ जण जखमी झाले. पाकिस्तानचे सैनिक आणि आयएसआय पुरस्कृत मुस्लिम कॉन्फरन्सकडून आंदोलकांवर गोळीबार होत असल्याचे म्हटले आहे.

मुझफ्फराबाद शहरातील हिंसाचाराचे व्हिडिओ पाकिस्तान वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत हवेत गोळीबार करताना एक नागरिक दिसतो तर दुसऱ्या व्हिडिओत आंदोलक मोटारीच्या टपावर उभे राहून झेंडा फडकवताना दिसतो तसेच आणखी एका दृश्‍यात आंदोलक पोलिसांनी वापरलेल्या गोळ्या दाखवताना दिसतो.

आंदोलक आणि पोलिस हे एकमेकांवर गोळीबार करताना दिसतात. गेल्या चोवीस तासांपासून पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये आंदोलन पेटले असून बाजारपेठ बंदचे आवाहन करत असताना चक्का जामने आंदोलनाने तणावात भर पडली. त्यामुळे इस्लामाबादने या भागात सुरक्षा दल तैनात केले असून कालपासून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरत आहे.

अवामी ॲक्शन कमिटीने आंदोलन तीव्र केले आहे. मुझफ्फराबाद येथे जमावासमोर बोलताना एएसीचे नेते शौकत नवाज मीर यांनी आमची मोहीम कोणा एका संस्थेविरुद्ध नसून मुलभूत अधिकारासाठी असल्याचे म्हटले आहे. गेल्या सात दशकांपासून आम्ही मानवी हक्कांसाठी आतुर झालेलो आहोत. आता सहनशीलता संपली असून आता एक तर हक्क द्या किंवा जनतेच्या असंतोषाचा सामना करा, असा इशारा एएसीने दिला आहे.

त्याचवेळी इस्लामाबादकडून पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील आंदेालन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सशस्त्र दल तैनात करण्यात आले असून प्रमुख शहरांत फ्लॅग मार्चही करण्यात आला आहे. पंजाब प्रांतातील पोलिसांची कुमक रवाना करण्यात आली आहे. शनिवार आणि रविारी पोलिसांनी प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते बंद केले आणि वाहतूक थांबविण्यात आली.

इस्लामाबाद येथून एक हजार सैनिकांची तुकडी पाठविली. काही महिन्यांपासून अवामी ॲक्शन कमिटीला लोकप्रियता मिळत आहे. या संघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांत एकजूट होत आहेत. अवामी ॲक्शन कमेटीने ३८ सूत्री सुधारणांची मागणी केली आहे.

महागाईने जनता त्रस्त

व्याप्त काश्‍मीरमधील जनता महागाईने त्रस्त आहे. गव्हाच्या पीठापासून वीज दरापर्यंतच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. स्थानिक नागरिक आता जम्मू काश्‍मीरमध्ये मिळणाऱ्या सुविधांशी तुलना करत असून या भागातील ढासळणाऱ्या स्थितीला पाकिस्तानला जबाबदार धरत आहेत. तत्पूर्वी एएसी प्रतिनिधी, व्याप्त काश्‍मीर प्रशासन आणि पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्री यांच्यात तेरा तासांची मॅरेथॉन बैठक यशस्वी झाली नाही. यानंतर समितीने बंदची घोषणा केली. त्यामुळे सरकारने इंटरनेटही बंद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'तो परत आलाय!' पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे धाबे दणाणले; महाराष्ट्रात गेलेल्या ओंकार हत्तीचा U-Turn

Mopa: 'आमच्या जमिनी गेल्या, नोकरी नाही, टॅक्सी तरी चालवू द्या'! मोपा पार्किंग शुल्कप्रकरणी आंदोलन; 3 ऑक्टोबरला खास बैठक

Goa Opinion: गोव्याची जमीन लुटणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांना ओळखून, त्यांना हरवण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो का?

गोव्यात एक काळ असा होता, हॉटेलात तुमचे पैसे विसरले तर नंतर सहज परत मिळायचे; वाढत्या हिंसक घटना आणि मानसिकता

आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर 'सूर्यकुमार' गोव्यात, क्रिकेट मैदानाचे करणार उद्घाटन

SCROLL FOR NEXT