General Qamar Javed Bajwa Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: मोठा खुलासा, पाकचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा हिरोइन्ससोबत करायचे 'सेक्स'

Pakistan Former Army Chief: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Former Army Chief: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी देशातील बड्या नेत्यांना हनीट्रॅप करण्यासाठी अभिनेत्रींचा वापर केला. जनरल कमर जावेद बाजवा आणि माजी आयएसआय प्रमुख जनरल फेस या पाकिस्तानी अभिनेत्रींना गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात बोलावून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा दावा त्यांनी केला.

गंभीर आरोप

आदिल राजा एक यूट्यूब चॅनल चालवतात. त्यांचे 3 लाख सबस्काईबर्स आहेत. आदिल राजा यांच्या चॅनलचे नाव 'सोल्डर स्पीक्स', असे आहे. हा खुलासा त्यांनी आपल्या चॅनलवरच केला आहे. आदिल राजा यांनी दावा केला की, पाकिस्तानचे लष्करी अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी या अभिनेत्रींचा वापर करत होते. हे आयएसआय (ISI) अधिकारी या अभिनेत्रींना हनीट्रॅप करण्यासाठी राजकारणी आणि देशातील इतर शक्तिशाली लोकांकडे पाठवतात आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बनवतात.

दुसरीकडे, या दाव्यानंतर आदिल राजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुबरा खान यांच्या फोटोसह व्हायरल झाला. वास्तविक, आदिल राजा यांनी आपल्या खुलाशात अभिनेत्रींचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त याबाबत इशारा केला. राजा यांनी MH, MK आणि SA अशा प्रकारे नावे घेतली आहेत.

त्यानंतर, आदिल राजा यांनी स्पष्ट केले की, त्या नावांमध्ये पाकिस्तानसह (Pakistan) संपूर्ण जगातील अनेक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. ते पुढे म्हणाले की, 'सोशल मीडियावर कोणाच्याही नावाचे मी समर्थन करत नाही किंवा कोणत्याही नावाचा मी निषेध करत नाही.' दुसरीकडे, आदिल राजा यांच्या या दाव्यावरुन पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे.

तसेच, मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुब्ब्रा खान यांनी आदिल राजांच्या दाव्याचा तीव्र निषेध केला आहे. त्याचबरोबर या अभिनेत्रींच्या चाहत्यांनी अभिनेत्रींना मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे सजल अलीने म्हटले आहे.

दरम्यान, कुब्ब्रा खानने सांगितले की, 'मी पाकिस्तानच्या माजी लष्करी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.' आदिल राजा यांनी तीन दिवसांत पुराव्यासह समोर यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. त्या पुढे म्हणाल्या, 'मी सुरुवातीला शांत राहिले कारण मला माहित आहे की, बनावट व्हिडीओ माझी ओळख खराब करु शकत नाही, पण आता खूप झाले. काही लोक बसून माझ्याकडे बोटे दाखवतील आणि मी गप्प राहीन असे तुम्हाला वाटते का, हा तुमचा गैरसमज आहे. त्यामुळे आदिल राजा तुम्ही आरोप करण्यापूर्वी आधी पुरावे दाखवा. तुम्हाला 3 दिवसांत पुराव्यासह यावे लागेल. अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करेन.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT