Imran Khan

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

पाकिस्तानी अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानला 'आल इज वेल' चा दिलासा

पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (FBR) चे माजी अध्यक्ष शब्बर झैदी (Shabbar Zaidi) यांनी पाकिस्तानला दिवाळखोर देश म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (FBR) चे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी पाकिस्तानला (Pakistan) दिवाळखोर देश म्हटले आहे. सर्व काही ठीक असल्याचा इम्रान खान (Imran Khan) सरकारचा दावा खोटा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एफबीआरचे माजी अध्यक्ष शब्बर जैदी यांनी पाकिस्तानचे दिवाळे निघाल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान झैदी म्हणाले, "पाकिस्तान एक संस्था म्हणून दिवाळखोर आहे.

शब्बर झैदी(Shabbar Zaidi) पुढे म्हणाले- आमचे पंतप्रधान देशात सर्व काही चांगले असल्याचे सातत्याने म्हणत आहे. आम्ही देशात बदल आणतो परंतु चुकीचे आहे, मला वाटते की, सध्या देश दिवाळखोर आहे. ते पुढे म्हणाले, 'सगळं सुरळीत सुरु असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र या सर्व गोष्टी खोट्या आहेत.

दरम्यान, हमदर्द विद्यापीठात (Hamdard University) एका भाषणादरम्यान, पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष म्हणाले की, आम्ही हे करु किंवा ते करु, असे देशाला सांगणे म्हणजे केवळ जनतेची फसवणूक करणे होय. मात्र, आता झैदी यांनी ट्विटरवर या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या भाषणाच्या केवळ तीन मिनिटांच्या क्लिपबद्दल बोलले जात आहे. मात्र पुढील तोडगाही त्यांनी बोलून दाखवला, मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेने पाकिस्तानच्या खराब अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात असे म्हटले आहे की, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला बाह्य आर्थिक व्यवस्थेसाठी 51.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 38.73 ट्रिलियन रुपयांची भारतीय रुपयांची गरज आहे जेणेकरुन ते दोन वर्षांच्या (2021-23) आर्थिक पूर्तता करु शकतील. द न्यूज इंटरनॅशनलच्या अहवालाचा हवाला देत या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये पाकिस्तानला 23.6 अब्ज डॉलर्सची गरज होती, जी 2022-23 मध्ये 28 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT