Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

'चीनने बनवलेला CPEC कॉरिडॉर पाकिस्तानसाठी शेवटचा पर्याय'

पाकिस्तानची आर्थिक स्थिती खलावत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानची आर्थिक स्थिती खलावत चालली आहे. नागरिक महागाईने त्रस्त आहेत. यातच आज पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, ''पाकिस्तानचे आर्थिक भवितव्य ग्वादर बंदरासह चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या यशाशी जोडलेले आहे. हे संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाकिस्तानी नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.''

'नौदलाची गरज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची'

शरीफ पुढे म्हणाले की, ''वाढत्या ब्लू इकॉनॉमी, सागरी सुरक्षा आणि धोरणात्मक हितसंबंधांमुळे पाकिस्तानी नौदलाची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. भू-राजकीय बदलांमुळे सागरी क्षेत्रे वेगाने विकसित होत आहेत. याच पाश्वभूमीवर मला खात्री आहे की, पाकिस्तानचे नौदल आपल्या संसाधनांसह आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडेल''.

चीनसोबत संयुक्त प्रकल्प विकसित केल्याने नौदलाचे कौतुक

पाकिस्तानची (Pakistan) सागरी सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या नौदलाला बळकट करणे आवश्यक आहे. नौदलाला संसाधने उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे देखील शरीफ यावेळी म्हणाले. आपल्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानचे नौदल प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज असल्याची खात्री पाकिस्तान सरकार करेल. स्वदेशी क्षमता विकसित करण्यावर भर देताना शरीफ पुढे म्हणाले की 'चीनसोबत (China) संयुक्त प्रकल्प विकसित केल्याने पाकिस्तानच्या नौदलाचे कौतुक आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT