Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तान संसदेने पंतप्रधान इम्रान खान विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

क्रिकेटमध्ये निष्णात असलेल्या इम्रानने राजीनामा देण्यास नकार देत शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहण्याचे संकेत दिले होते.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव डेप्युटी स्पीकर कासीम सुरी यांनी फेटाळून लावला आहे. इम्रान खान यावेळी संसदेत उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी राष्ट्रपतींना तत्काळ पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आता इम्रान खान यांनी मध्यावधी निवडणुकांचे (Elections) संकेत दिले आहेत. मी राष्ट्रपतींना विनंती करतो की त्यांनी हे मंत्रिमंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्या, असे इम्रान खान म्हणाले आहेत.

क्रिकेटमध्ये निष्णात असलेल्या इम्रानने राजीनामा देण्यास नकार देत शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहण्याचे संकेत दिले होते. मला सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी विदेशी शक्तींसोबत षडयंत्र रचल्याचे इम्रान खान (Imran Khan) म्हणाले होते. इम्रान खान यांनी एक मेमो प्रसारित केला होता, ज्यामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले की वॉशिंग्टनने पाकिस्तानच्या (Pakistan) विरोधी पक्षांसोबत षडयंत्र रचले आहे आणि त्यांना सत्तेवरून दूर केले आहे. कारण अमेरिकेला 'वैयक्तिकरित्या, मला सत्तेतून काढून टाकले पाहिजे... आणि सर्व काही माफ केले जाईल' असे वाटते, असे मत त्यांनी या मेमो मधून व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT