श्रीलंकेत 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म' वापरण्यावर बंदी

शनिवारी श्रीलंकेत कर्फ्यूचा आदेश जारी करण्यात आला होता.
ban on social media applications in Sri Lanka
ban on social media applications in Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कर्फ्यू लागू केल्यानंतर आता तेथील सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. रविवारपासून, श्रीलंकेत फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले आहेत. (ban on social media applications in sri lanka)

ban on social media applications in Sri Lanka
177 खासदारांचा पाठिंबा असल्याचा विरोधकांचा दावा, इम्रान खानचे सरकार जाणे निश्चित?

शनिवारी रात्री उशिरापासून कोलंबोसह अनेक शहरांमध्ये सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मने काम करणे बंद केले. आज देशभर सुरू असलेली निदर्शने रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेत लागू करण्यात आलेल्या कर्फ्यू दरम्यान, अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या लोकांना ओळखपत्राद्वारे फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी शनिवारी श्रीलंकेत कर्फ्यूचा आदेश जारी करण्यात आला होता. येथे शनिवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.

ban on social media applications in Sri Lanka
गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

कर्फ्यू दरम्यान, लोकांना रस्ते, उद्याने, रेल्वे (Railway), समुद्रकिनारे यासह सर्व सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंका सरकारच्या म्हणण्यानुसार, निदर्शनांमध्ये आतापर्यंत 3 कोटी 90 लाख रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, मिर्हान भागात राष्ट्रपती निवासस्थानाजवळ झालेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 17 पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीलंकेच्या (Sri Lanka) आर्थिक दुर्दशेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की कोलंबोमध्ये 13-13 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. लोकांना खाण्यापिण्याची सोय नाही. लोक हिंसक निदर्शने करत आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिलपासून देशात आणीबाणी लागू केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशात देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हे करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com