Helicopter Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Army: बलुचिस्तानात पाक लष्कराचे हेलिकॉप्टर बेपत्ता; 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू

Pakistan News: पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Army Helicopter Missing: पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. बलुचिस्तानमध्ये पूर मदत मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याचे पाकिस्तानी लष्कराने सांगितले.

लष्कराने निवेदनात काय म्हटले

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) कमांडर 12 कॉर्प्ससह 6 अधिकारी होते.' पाकिस्तानच्या स्थानिक मीडियाने दावा केला आहे की, कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि दोन मेजर यांच्या व्यतिरिक्त, पाकिस्तान कोस्ट गार्डचे महासंचालक ब्रिगेडियर अमजद हनिफ सत्ती हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते.

दुसरीकडे, पोलीस (Police) अधिकारी परवेझ उमरानी यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, हेलिकॉप्टर सहा तासांहून अधिक काळ बेपत्ता होते. यातच आयएसपीआरचे महासंचालक (DG) यांनी ट्विट करत सांगितले की, 'लसबेला जिल्ह्यातील मुसा गोठ गावात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह 6 अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला आहे.' खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

त्याचबरोबर, ही घटना चिंताजनक असल्याचे म्हणत पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत न मिळाल्याबद्दल प्रांतीय नागरी अधिकाऱ्यांना जबरा दम दिला. देश प्रार्थना करत असल्याचे देखील शरीफ यांनी म्हटले.

शिवाय, आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पाकिस्तानमध्ये (South Pakistan) पावसामुळे आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेकडो घरे वाहून गेली आहेत. पूर आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी, नागरी प्रशासन पाकिस्तान लष्करावर खूप अवलंबून असते, कारण ती देशातील सर्वात शक्तिशाली संस्था आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT