पाकिस्तानच्या एअरहोस्टेस कॅनडामध्ये विमान पोहचल्यानंतर गायब होतात अशी बातमी पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने ( Dawn ) ने दिली आहे.
सोमवारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स( PIA )चे PK-782 हे विमान इस्लामाबादहून टोरंटोला पोहचले. या विमानात मरियम राझा ( Maryam Raza ) ही एअर होस्टेस होती. मात्र विमान टोरंटोमध्ये पोहचल्यानंतर कराचीला जाणाऱ्या PK-784 या विमानात तिची ड्यूटी होती, त्याठिकाणी ती पोहचली नाही. त्यानंतर हॉटेलरुममध्ये पोहचल्यानंतर तिच्या युनिफॉर्मसहित 'थँक यू पीआयए' ( PIA ) असे लिहलेली एक चिठ्ठी सापडल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरहोस्टेस गायब होण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात अशीच घटना झाल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटले आहे. गतवर्षीदेखील पीआयएचे क्रू मेंबर कॅनडात पोहचल्यानंतर ड्यूटीदरम्यान अचानक गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत पाकिस्तानमधून कॅनडात आलेल्या 9 एअर होस्टेस ड्युटीदरम्यान गायब झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी असेही वक्तव्य केले आहे की, काही वर्षापूर्वी एक क्रू मेंबर कॅनडात स्थायिक झाला होता. त्याने इतरांना कॅनडात आश्रय घेण्यासाठी मदत केली असल्याचा अंदाज आहे.
कॅनडात कोणताही व्यक्ती गेला असता तो त्या देशात स्थायिक होऊ शकतो, आश्रय घेऊ शकतो असा कायदा असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पाकिस्तान इंटरनॅशनल एजन्सी कॅनडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन योग्य उपाययोजना करणार असल्याचे पीआयएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.