Taliban in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Chaman Border : चमन बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती

Chaman Border : युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानमधील चार मौलवींचे प्रतिनिधीमंडळ अफगानिस्तानमध्ये जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Chaman Border : पाकिस्तान आणि अफगानिस्तानच्या चमन बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानमधील चार मौलवींचे प्रतिनिधीमंडळ अफगानिस्तानमध्ये जाणार आहे. मौलवींचे हे प्रतिनिधीमंडळ तालिबानकडून चमन बॉर्डरवर होणाऱ्या हल्ल्यांना कसे रोखले जाईल यावर चर्चा करणार आहे .

चमन जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौलवींचे हे प्रतिनिधीमंडळ अफगानिस्तानच्या रक्षा मंत्रालयात अफगानिस्तानचे अधिकारी आणि तालिबानचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर आलेल्या मााहितीनुसार, चमन बॉर्डरवर सतत होणाऱ्या हल्लांमुळे दोन्ही देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, पाकिस्तान आणि अफगानिस्तान या दोन देशांमध्ये सीमाप्रश्नावरुन सातत्याने वाद आहेत.

पाकिस्तान ( Pakistan ) आणि अफगानिस्तान ( Afganistan ) यांच्यामध्ये 2600 किलोमीटरची सीमारेषा आहे. ही सीमारेषा बलुचिस्तानला अफगानिस्तानमधल्या कंधारला जोडते. एका हत्यारधारकाने ही सीमारेषा पार करत पाकिस्तानमध्ये प्रवेश करत सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला होता , त्यानंतर ही बॉर्डर बंद करण्यात आली आहे. आता मौलवींचे प्रतिनिधीमंडळ आणि अफगानिस्तानमधील होणाऱ्या चर्चेनंतर चमन बॉर्डरचा प्रश्न सुटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT