Drone Attack In Sudan Dainik Gomantak
ग्लोबल

Drone Attack In Sudan: सुदानची राजधानी खार्तूममध्ये ड्रोन हल्ला; 40 ठार, 36 जखमी!

Sudan: सध्या सर्व जखमींना सुदानमधील बशीर विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manish Jadhav

Drone Attack In Sudan: सुदानमधील लष्कर आणि निमलष्करी दल आरएसएएफ यांच्यातील संघर्षादरम्यान रविवारी राजधानी खार्तूममधील बाजारपेठेत ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 36 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.

जखमींना बशीर विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

सध्या सर्व जखमींना सुदानमधील (Sudan) बशीर विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रविवारच्या ड्रोन हल्ल्यामागे कोणत्या पक्षाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हल्ले आता नागरी भागाकडे वाढत आहेत

सुदानमध्ये 15 एप्रिलपासून सुरु झालेल्या गृहयुद्धानंतर नागरिकांच्या (Citizens) मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. हल्ले आता नागरी भागाकडे वाढत आहे. लष्कर आणि निमलष्करी दले यांच्यात एप्रिल महिन्यापासून येथे सत्तेच्या नियंत्रणासाठी संघर्ष सुरु आहे.

4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला

ऑगस्टमधील संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सैन्य आणि आरएसएफ यांच्यातील संघर्षात 4,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. गृहयुद्धामुळे मोठ्या संख्येने लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

हिंसाचारामुळे सुमारे 71 लाख लोकांनी आपली घरे सोडली आहेत. 11 लाख लोकांनी परदेशात आश्रय घेतला आहे तर लाखो लोक देशात इतरत्र राहत आहेत.

युनायटेड नेशन्स रिफ्यूजी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून सुर झालेल्या गृहयुद्धामुळे सुदानमधील परिस्थिती बिकट झाली आहे. एप्रिलपासून निर्वासितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही संख्या 7.1 दशलक्षांवर पोहोचली आहे. तर 1.1 दशलक्ष निर्वासितांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT