Iran Drone Threat Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

Iran Drone Threat On Oscars 2026 : जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 98व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर यंदा युद्धाचे भीषण सावट निर्माण झाले.

Manish Jadhav

Iran Drone Threat On Oscars 2026: जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 98व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर यंदा युद्धाचे भीषण सावट निर्माण झाले. अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने कॅलिफोर्निया पोलिसांना एक अत्यंत गंभीर इशारा दिला असून इराणकडून वेस्ट कोस्टवर ड्रोन हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचा बदला घेण्यासाठी इराण या जागतिक सोहळ्याला लक्ष्य करु शकतो, असे एफबीआयने आपल्या अहवालात म्हटले. या इशाऱ्यानंतर लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड परिसराला छावणीचे स्वरुप आले असून डॉल्बी थिएटर आणि रेड कार्पेट परिसराची सुरक्षा व्यवस्था अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्कर सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून बुधवारी रेड कार्पेटचे अनावरण करण्यात आले. मात्र, त्याचवेळी एफबीआयने संपूर्ण कॅलिफोर्नियामध्ये इराणी हल्ल्याचा इशारा जारी केला. अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा प्रतिशोध म्हणून इराणकडून अमेरिकेच्या (America) पश्चिम किनारपट्टीवर ड्रोन डागले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 'एबीसी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाने या इशाऱ्यावर अधिकृत भाष्य करणे टाळले असले तरी, 'एलए टाइम्स'ला दिलेल्या निवेदनात त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कडक सतर्कता बाळगल्याचे स्पष्ट केले आहे. सुरक्षा यंत्रणांनी डॉल्बी थिएटरभोवती अभेद्य तटबंदी उभारली असून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

98व्या ऑस्कर सोहळ्याच्या क्रिएटिव्ह टीमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर राज कपूर यांनी पाहुण्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली आहे. राज कपूर यांच्या मते, सोहळ्यासाठी जगातील सर्वोत्तम सुरक्षा टीम तैनात असून त्यांना एफबीआय आणि एलएपीडी (लॉस एंजेलिस पोलीस विभाग) कडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. "जगभरात काय घडत आहे, यावर आमचे दरवर्षी लक्ष असते. घड्याळाचा काटा फिरत राहतो तसा हा शो देखील सुरु राहील, मात्र आमचे पहिले प्राधान्य पाहुण्यांच्या सुरक्षेला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. सोहळ्याला उपस्थित राहणारे कलाकार असोत किंवा बॅरिकेड्सच्या बाहेर उभे राहून पाहणारे चाहते, प्रत्येकाला सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटावे यासाठी सुरक्षा यंत्रणा कोणतीही कसर सोडत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

'व्हरायटी'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्कर सोहळ्यासाठी रेड कार्पेटची लगबग सुरु झाली असून तिथे सुरक्षा रक्षक आणि आधुनिक यंत्रणांचा वावर वाढला आहे, परंतु सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे बदल अत्यंत शिताफीने करण्यात आले आहेत. ऑस्कर पुरस्कार प्रदान करणारी संस्था 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'ने या सुरक्षा धोक्यावर अद्याप अधिकृत टिप्पणी केलेली नाही. 15 मार्च 2026 रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडणार असून कोनन ओ'ब्रायन या सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहेत. भारतात हा सोहळा 16 मार्च 2026 रोजी पहाटे थेट पाहता येणार आहे. जागतिक स्तरावर युद्धाचा तणाव असताना, हॉलिवूडचा हा सर्वात मोठा उत्सव सुरक्षित पार पडावा, यासाठी संपूर्ण जगाकडून प्रार्थना केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

जंतरमंतरवर सरकारविरोधात तरुणाई, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT